वागले की दुनियेचा पीसीओडीबाबत जागरूकतेविषयी खास एपिसोड  
मनोरंजन

Wagle Ki Duniya : ‘वागले की दुनिये’चा पीसीओडीबाबत जागरूकतेविषयी खास एपिसोड

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी सबवरील मालिका 'वागले की दुनिया' वागले कौटुंबिक कथानक आणि कुटुंबाच्‍या दैनंदिन जीवनासह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. (Wagle Ki Duniya) साई दर्शन सोसायटीमध्‍ये राहणारे हर्षद व ज्‍योती त्‍यांची मुलगी गुनगुनसाठी योग्‍य नवरदेवाचा शोध घेत आहेत. गुनगुनदेखील त्‍यांच्‍या या विचाराला विरोध करत नाही. गुनगुन विवाहासाठी अजून खूप लहान आहे, ज्‍यामुळे हा विवाह तिच्‍यासाठी या वयात योग्य नाही. सोसायटीमधील सदस्‍यांना ही बातमी समजते तेव्‍हा त्यांना धक्‍का बसतो आणि ते हर्षदचे मन वळवण्‍याचा प्रयत्‍न करतात, पण हर्षद आपले मन बदलत नाही. सखी याबाबत सखोलपणे चौकशी करते आणि तिला हा विवाह लवकर करण्‍यामागील खरे कारण समजते की, गुगगुनचे पीसीओडी (पॉलिसिस्टिक ओव्‍हरियन डिसीज)सह निदान झाले आहे. (Wagle Ki Duniya)

जे कुटुंब सर्वांपासून लपवण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. डॉक्‍टरांशी सललामसलत करून आणि प्रजननक्षमता व मासिक पाळीवरील या आजाराच्‍या परिणामांबाबत समजल्‍यानंतर हर्षद तिचा लवकर विवाह करण्‍याचे ठरवतो. ही स्थिती आणि तरुण मुलीला आजाराने पीडित असल्‍याचे पाहू न शकणारी वंदना राजेशला हर्षदसोबत बोलण्‍यास आणि त्‍याला समजावण्यास सांगते की, लवकर विवाह तिच्‍या या निदानासाठी योग्‍य उपाय नसून आरोग्‍यदायी जीवन जगणे महत्त्वाचे आहे.

पीसीओडीबाबत आपले मत व्‍यक्‍त करत सखीची भूमिका साकारणारी चिन्‍मयी साळवी म्‍हणाली, ''अनेक लोकांना पीसीओडीबाबत माहित नाही. खरेतर हा आजार महिलांमध्‍ये अधिक सामान्‍य बनला आहे. ज्‍यामुळे त्‍यांची जीवनशैली तणावपूर्ण होते. पीसीओडीमुळे वंध्‍यत्‍व व मासिक पाळीदरम्‍यान अधिक रक्‍तस्राव अशा अनेक समस्‍यांचा त्रास होतो, ज्‍याचा महिलांच्‍या मानसिक आरोग्‍यावर परिणाम होतो. पण अशा स्थितीमध्‍ये मुलीचा लवकर विवाह करणे या समस्येचे निराकरण नाही. मी आशा करते की, आमच्‍या मालिकेच्‍या माध्‍यमातून आम्‍ही लोकांना या आजाराबाबत जागरूक करू आणि त्‍यांना त्‍यांच्‍या जीवनात उत्तम व विचारशील निर्णय घेण्‍यास प्रोत्‍साहित करू. आमचे सर्व लोकांमध्‍ये जागरूकता निर्माण करण्‍याचे ध्‍येय आहे. ज्‍यामुळे या आजारापासून पीडित असलेल्‍या महिलांना आवश्‍यक सहाय्य मिळू शकेल.''

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT