पुढारी ऑनलाईन डेस्क : प्यार का पंचनामा फेम अभिनेत्री सोनाली सहगलने तिच्या इंडस्ट्रीतील जुन्या आठवणी सांगितल्या. (Sonali Sehgal) तिने कार्तिक आर्यन, नुसरत भरुचा, सनी सिंगसोबत प्यार का पंचनामा या चित्रपटातून डेब्यू केला होता. लव रंजनच्या चित्रपटात जाण्याचा तिचा हा आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता,असे ती म्हणते. हा चित्रपट यशस्वी ठरला आणि तिचे करिअर कसे उंचावत गेले, याबद्दल तिने सांगितले. (Sonali Sehgal)
ती यावर्षी जूनमध्ये लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड बिझनेसमन आशीष सजनानीसोबत ती लग्नबंधनात अडकली. मुलाखतीत तिला विचारण्यात आले की, लग्नानंतर तिच्या आयुष्यात काय बदल झाला आहे, त्यावेळी सोनाली म्हणाली, सर्वजण मला विचारतात की, तुझ्या जीवनात लग्नानंतर काय बदल झाला आहे आणि मी सांगते की, सर्व तेच आहे, पण वेगळं. खरंच सुंदर आणि अपेक्षेपेक्षा उत्तम आहे. योग्य जोडीदार असेल तर ते खूपचं सुंदर आहे.
लग्नानंतर सोनाली पुन्हा आपल्या नव्या प्रोजेक्टसाठी सेटवर परतली होती. आगामी प्रोजेक्टबद्दल ती म्हणाली, खरंतर मी ब्रेक घेतलाय. पण नव्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी भोपाळला आणि नंतर हरियाणा येथे जाईन. या चित्रपटाचे नाव उद्याप गुलदस्त्यात आहे. पण तो चित्रपट जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी (जेएनयू) वर आधारित असून खूप इंटरेस्टींग टॉपिक आहे.
सोनाली म्हणाली, सहकलाकार कार्तिक आर्यन ऑडिशनसाठी मुंबई लोकलने प्रवास करत असल्याचे आठवते. त्याच्या संघर्षाच्या काळात कार्तिकने खूप मेहनत घेतल्याचे तिने सांगितले. तो वाशीतून लोकल रेल्वेतून ऑडिशन द्यायला जायचा.