Latest

Sonalee Kulkarni : ‘अप्सरे’चा नऊवारी नव्हे तर दहावारीत ‘धुरळा’

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपटसृष्टीची 'अप्सरा' अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni ) काही दिवसांपूर्वी प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' चित्रपटातील चंद्रा गाण्यावर ठेका धरला होता.  तिच्या डान्सच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. सोनाली 'चंद्रमुखी' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.  सध्या अप्सरा नऊवारीत नव्हे तर चक्क दहावारी मनमोहक दिसत आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni ) नुकतेच इंन्स्टाग्रामवर मराठमोळा साडीतील लूक शेअर केला आहे. या फोटोत सोनालीने गुलाबी रंगाच्या दहावारी साडीत खुलून दिसत आहे. यासोबत तिने मोकळ्या केसांसोबत नाकात नथ, साजेशीर दागिने आणि मेकअपने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे. यातील खास म्हणजे, स्लिव्हलेस ब्लॉऊज आणि गुलाबी रंगाच्या साडीवरील डिझाईनने चार चॉद लावले आहेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये सोनालीने 'फर. दहावारी ?' असे लिहिले आहे. या फोटोत सोनाली खूपच मननोहक आणि अप्रतिम दिसतेय. गुलाबी रंग तिच्या सौदर्यांत भर घालत आहे. या यावरून ती छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) तसेच समस्त मराठवाड्यातील पहिल्याच दैदिप्यमान दालनाच्या भव्य उद्घाटन सोहळ्या पोहोचली होती. या सोहळ्यासाठी तिने खास असा मराठमोळा लूक केला होता. तिने फोटोला हटके पोझ दिल्याने चाहते घायाळ झाले आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह अनेक स्टार्संनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात निर्माता अक्षय बर्दापूरकर यांनी हास्याचा तीन ईमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. एका युजर्सने 'Gorgeous ?', 'Omg!❤️ this is so effin' hot!??', 'Cute smile ??????', तर दुसऱ्या एका युजर्सने 'नंजराना ???', 'सुंदर दिसतेस् ???', 'भारी ?❤️', 'महाराष्ट्राची हिरकणी??', 'धुराळा…. ❤️', 'खूपच सुंदर दिसताय नऊवारी साडीत', 'अप्सरा आली ?????', 'सुरेख ?❤️❤️', 'किती सुंदर दिसतेस ग साडीत ?????', 'नजर लागेल'. 'मोरपंखी ?'. यासारख्या असंख्य कॉमेन्टसनी बॉक्स भरलेला आहे. याशिवाय काही युजर्सनी हार्ट आणि फायरचा ईमोजी शेअर केले आहेत.

याआधी सोनालीचे ब्ल्यू रंगाच्या कोट आणि पांढऱ्या आणि ब्लॅक रंगाच्या शर्टमधील काही फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ब्ल्यू रंगाचा हार्ट ईमोजी शेअर केला आहे. तिच्या या फोटांनी देखील सोशल मीडियात धुमाकूळ घातला होता.

याशिवाय सोनालीच्या इंन्स्टावर ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अभिनयासह सौंदर्याने चाहत्याना नेहमीच मंत्रमुग्ध करत असते.  नुकताच तिचा 'झिम्मा' आणि 'पांडू' मराठी चित्रपट प्रदर्शित झाले हाेते.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT