sonalee kulkarni 
Latest

Sonalee Kulkarni : सोनालीने आजोळ अमृतसरची केली सफर(Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या आजोळी म्हणजेच अमृतसरची सफर केलीय. (Sonalee Kulkarni) अमृतसरमधील काही फोटोज आणि व्हिडिओ सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटो आणि व्हिडिओमध्ये ती शेतात ट्रॅक्टरदेखील चालवताना दिसते. तिच्यासोबत तिचा पती कुणाल बेनोडेकरदेखील दिसतेय. (Sonalee Kulkarni)

सोनालीने स्वत: ट्रॅक्टर चालवला आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला असून घर की खेती कनक गेहूँ अशी कॅप्शन लिहिलीय. तिने पुढे लिहिलं की – कुणाल म्हणाला की, त्याला आमचं शेतं आणि गाव बघायचं आहे…. तर इथे आम्ही अनुभवत आहोत!

दुसऱ्या फोटोमध्ये ती आणि कुणाल शेतामध्ये रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. तिने या फोटोंना कॅप्शन लिहिलीय की-सरसों के खेत में परसों वाली फोटो…. ?. Quite literally क्योंकि आज हम अलग शहर आए है (just for you to get the caption right)… #updatessoon #staytuned. Till then Showing some पिंड दा प्यार … in साड्डा अमृतसर … in साड्डा पिंड.

तिसऱ्या फोटोमध्ये ती आणि कुणाल अमृतसरच्या मंदिराबाहेर उभे असलेले दिसतात. तिने मंदिराचे काही फोटो शेअर केले आहेत. तिने या फोटोंना कॅप्शन लिहिलीय-' आई चं माहेर, आमचं आजोळ, अमृतसर असल्यामुळे लहानपणापासून अगदी दरवर्षी यायचो सुवर्ण मंदिर मध्ये… मग पुढे कॅालेज पासून दोन वर्षांतून एकदा…आणि मग पुढे ही gap वाढतंच गेली… यंदा साधारण ६-७ वर्षांनी आलोय अमृतसर ला … पण यंदा ची सुवर्ण मंदिराची फेरी ही खास आहे… #kunal आणि संपूर्ण #benodekar family पण आमच्या बरोबर आहे #kulkarni #kenosona #sonaleekulkarni. P.S. आजही या वास्तू बद्दल ची श्रद्धा आणि आकर्षण तेवढंच आहे… इथे सगळे समान, no vip lines, no privileges, २४ तास लंगर..

२० वर्षांनंतर सोनाली आणि तिचा भाऊ जालियनवाला बाग येथे पोहोचले. २० वर्षांपूर्वीचा येथील फोटोदेखील तिने शेअर केला आहे. यामध्ये ती २० वर्षांपूर्वी कशी दिसत होती, हे तुम्ही पाहू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT