वारजे, उत्तमनगर परिसरात बांधकामांवर कारवाई; इमारतीचा स्लॅब तोडला | पुढारी

वारजे, उत्तमनगर परिसरात बांधकामांवर कारवाई; इमारतीचा स्लॅब तोडला

वारजे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या बांधकाम विभागाने वारजे येथील सर्व्हे क्रमांक सहामध्ये अनधिकृत बांधकाम पाडले. तसेच उत्तमनगर भागातील सर्व्हे क्रमांक पंधरामधील तीन मजली इमारतीच्या अनधिकृत स्लॅबवरदेखील कारवाई करण्यात आली. वारजेत दोन हजार स्क्वेअर फूट, तर उत्तमनगर येथे तीन हजार स्क्वेअर फुटांची ही कारवाई करण्यात आली.

बांधकाम विकास विभागााचे कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे, उपअभियंता निवृत्ती उतळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कनिष्ठ अभियंता सचिन जावळकर, सतीश शिंदे, अजित ववले यांनी दोन जेसीबी, दोन ब्रेकर आणि सहा कर्मचार्‍यांच्या साहाय्याने ही कारवाई केली. या वेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Back to top button