सोनाक्षी सिन्हा 
Latest

sonakshi sinha : सोनाक्षी सिन्हा सलमान खानच्या घरची सून होणार ? तो आहे तरी कोण

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलीवूडमध्ये सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे चर्चांनाही उधाण आले आहे. आता एका नव्या चर्चे-नुसार अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाही (sonakshi sinha) लग्न करणार आहे. याबाबत अद्याप कुणीच ठामपणे काही सांगितलेले नाही. तथापि सोनाक्षी सलमान खानशी संबंधित एका व्यक्तीला डेट करत असून त्याच्याशीच लग्न करणार असल्याचे समजते.

सोनाक्षी सध्या सेलिब्रिटी मॅनेजर बंटी सचदेव सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे दोघे लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे. सोनाक्षी (sonakshi sinha) आणि बंटी एकमेकांचे अत्यंत चांगले मित्र असून दोघांना विविध पार्ट्यांमध्ये एकत्रित पाहिले गेले आहे. बंटी हा सोहेल खानचा मेहुणा आहे.

बंटीची सख्खी बहीण सीमा ही सोहेलची पत्नी आहे. दरम्यान, यापूर्वीही बंटीचे नाव सुश्मिता सेन, दिया मिर्झा, नेहा धुपिया, समीरा रेड्डी यांच्याशी जोडले गेले होते. कॉर्नर स्टोन ही पीआर एजन्सी बंटीच्या मालकीची आहे. त्याने यापूर्वी 2009 मध्ये अंबिका चौहानशी लग्न केले होते. त्यानंतर चार वर्षांनी त्यांच्यातील नाते संपुष्टात आले.

अक्षय कुमार-सोनाक्षी सिन्हा यांची 'डबल एक्सएल'ची जोडी!

अक्षय कुमार-सोनाक्षी सिन्हा (sonakshi sinha) यांनी यापूर्वी 'रावडी राठोड' आणि 'वन्स अपॉन अ टाईम मुंबई-2'मध्ये एकत्रित काम केले आहे. आता अक्षय कुमार-सोनाक्षी सिन्हा ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे. दिग्दर्शक मुदस्सर अझीज यांचा आगामी चित्रपट या दोघांनी स्वीकारला आहे.

मुदस्सर अझीज अलीकडच्या काळात खूप व्यग्र आहेत. ते एकाचवेळी अनेक चित्रपटांवर काम करीत आहेत. त्यातीलच एका चित्रपटात अक्षय आणि सोनाक्षी दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव त्यांनी 'डबल एक्सएल' असे ठेवले आहे.

पुढील वर्षी मार्चपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. या चित्रपटात खिलाडी कुमार आतापर्यंत न दिसलेल्या अवतारात दिसणार आहे. प्रोस्थेटिक मेकअपच्या मदतीने अक्षयला जाडजूड दाखवले जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी हे एक सरप्राईज असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT