sohail khan and seema khan 
Latest

Sohail-Seema Khan : ‘तिच्या’मुळे सोहेल-सीमाच्या संसारात पडला मिठाचा खडा?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

सोहेल खान आणि सीमा खान (Sohail-Seema Khan) आपल्या २४ वर्षांचं नातं संपुष्टात आणत आहेत. हे नाते संपुष्टात येण्यामागे एका बॉलीवूड अभिनेत्री असल्याचं म्हटलं जात आहे. (Sohail-Seema Khan)

सोहेल खान-सीमा खान यांना बांद्रा कोर्टाच्या बाहेर पाहण्यात आले. कोर्टातून बाहेर पडताना दोघे वेगवेगळ्या मार्गाने गेले. त्यामुळे खान परिवारात आणखी एक संसार तुटणार असल्याचे वृत्त येऊन धडकले. विवाहित असतानाही सोहेल खानचे नाव एका बॉलीवूड अभिनेत्रीशी जोडलं गेलं होतं. सध्या ते दोघे एकत्र स्पॉट करण्यात आल्याचे म्हटले जाते.

कुटुंबाविरोधात जाऊन केले होते लव्ह मॅरेज

सीमाला पाहिल्यानंतर सोहेल खानचा जीव जडला होता. दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोहेल-सीमाने १९९८ मध्ये लग्न कले होते. निकाह करण्यापूर्वी त्यांनी आर्य समाज मंदिरात लग्न केले होते. या लग्नामुळे सीमाचं कुटूंब खुश नव्हतं. परंतु, नंतर खान परिवाराने सोहेल खान-सीमा खान यांचे नाते स्वीकारले.

हुमा कुरेशीसोबत जोडलं गेलं होतं नाव

लग्नाच्या खूप वर्षांनंतर सोहेल खानचं नाव अचानक बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरैशी (Huma Qureshi) जोडलं गेलं होतं. सोहेल खान-हुमा कुरैशीच्या अफेअरच्या वृत्ताने धुमाकूळ घातला होता. अनेक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात होता की, अफेअरच्या वृत्तांमुळे सीमा खान नाराज होती आणि दोघांच्या नात्यात दुरावा आला. मीडिया रिपोर्टनुसार, सीमा खान अनेक महिन्यांपासून सोहेलसोबत राहत नव्हती, असे वृत्त होते.

शोमध्ये झाला खुलासा

सोहेल-सीमाच्या नात्याचं सत्य सर्वांसमोर आलं, जेव्हा नेटफ्लिक्स शो 'फॅबुलस लाईव्स ऑफ बॉलीवूड व्हाईव्स' रिलीज झालं. या शोमध्ये हे स्पष्ट केलं होतं की, ते दोघे वेगवेगळे राहतात. सीमाने हेदाखील म्हटलं होतं की- तिचं आणि सोहेलचं लग्न अनकन्वेंशनल आहे. एका एपिसोडमध्ये तिचा मुलगी निर्वाण याविषयी तक्रार करताना दिसला. शोमध्ये निर्वाण युएसएहून परत आला होता. सीमाने त्याला आपल्या घरी राहण्यासाठी म्हटलं होतं, पण, निर्वाणाला सोहेलसोबत राहायचं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT