Latest

Monsoon Forecast : यंदा मान्‍सून समाधानकारक ; ‘स्‍कायमेट’चा अंदाज

नंदू लटके

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन
यंदा देशात मान्‍सून समाधानकारक राहिल, असा अंदाज 'स्‍कायमेट' या खासगी संस्‍थेने व्‍यक्‍त केला आहे. ( Monsoon Forecast ) या अंदाजामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

२०१२ पासून 'स्‍कायमेट' ही संस्‍था मान्‍सूनचा अंदाज व्‍यक्‍त करते. २०२० चा अपवाद वगळता मागील ९ वर्ष मान्‍सूनचे अंदाज हे सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्‍यात व्‍यक्‍त केले जातात. यंदाही एप्रिल महिन्‍यातच २०२२ च्‍या मान्‍सूनचे सविस्‍तर अंदाज व्‍यक्‍त करणार आहे. मात्र प्राथमिक अंदाजात यंदा संपूर्ण देशभरात समाधानकारक पाऊस पडेल, असे या संस्‍थेने म्‍हटलं आहे.

Monsoon Forecast :यंदा मान्‍सून सरासरी ९७ ते ते १०४ टक्‍के

सध्‍या संस्‍थेकडून मान्‍सूनचे प्राथमिक आकड्यांची नोंद करत आहे. त्‍यामुळे आता जाहीर केलेली अंदाज हा प्राथमिक आहे. मागील काही वर्षांमध्‍ये मान्‍सूनचे आगमन, तीव्रता, कालावधी यामध्‍ये मोठे बदल होत आहेत. मागील दोन मान्‍सूनवर 'ला निना 'चा प्रभाव पडला. मात्र यंदा मान्‍सून सरासरी ९७ ते ते १०४ टक्‍के राहिल, असा अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे.

यासंदर्भात माहिती देताना स्‍कायमेटच्‍या जी. पी. शर्मा यांनी सांगितले की, "मागील सलग दोन वर्ष मान्‍सूनवर 'ला निना ' चा प्रभाव जाणवला. समुद्रा सपाटीवरील तापमान वाढेल मात्र यावर्षी 'ला निना ' चा प्रभाव पडणार नाही. यंदा मान्‍सून
सामान्‍य राहणार आहे". प्रशांत महासागरातील तापमानाची नकारात्‍मक स्‍थिती कमी होताना दिसत आहे. प्रशांत महासागरामधील परिस्‍थिती या वर्षी सामन्‍य पाऊस पडेल, असे संकेत देत आहे.

मागील १५ वर्षांपासून स्‍कायमेटकडून हवामानाचे विश्‍लेषण केले जाते. हे अंदाज महाराष्‍ट्र सरकार, गुजरात सरकार यांच्‍यासह एनएसडीएमए, एसबीआय, यूएसएआयडी, रिलायंस इंफ्रा, वर्ल्ड बँक एडीएफसी, ईआरजीओ, आयएफसी, कृषी विमा महामंडळ, आयसीआयसीाय आदी कंपनींच्‍या नियोजनात महत्‍वाची भूमिका बजावतात.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT