सावंतवाडी (सिंधुदुर्ग): पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पहिल्या ई- कोलगाव ग्रामपंचायत मोबाईल ऍपचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. यापूर्वीच कोलगाव ग्रामपंचायतिने स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक केला आहे. तर आता स्वतःचा ई ग्रामपंचायत मोबाईल ऍप तयार करून गावातील लोकांना घरपोच दाखले व ऑनलाईन सुविधा देणारी कोलगाव ग्रामपंचायत ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या संकल्पनेतुन प्रेरणा घेत कोलगाव ग्रामपंचायतिने ई कोलगाव ग्रामपंचायत मोबाईल ऍप तयार केला आहे. कोलगाव गावच्या लोकांना घरबसल्या सर्व सुविधा व ऑनलाईन दाखले मिळावेत यासाठी ग्रामपंचायतिने स्वतःचा ऍप विकसित करावा अशी संकल्पना कोलगावचे माजी सरपंच माजी उपसभापती तसेच विद्यमान जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी मांडली होती.
त्यानंतर कोलगाव सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग व ग्रामपंचायतिची पूर्ण टीमने काम केले. या ऍप द्वारे घरपट्टी भरणे, ग्रापं स्तरावरील सर्व दाखले ऑनलाईन घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. त्याशिवाय मासिक सभा, ग्रामसभेचे मेसेज, अंदाजपत्रक, जमा खर्च ही या ऍप द्वारे गावच्या लोकांना पाहता येणार आहे.
ग्रामपंचायतने प्रातिनिधिक स्वरूपात विश्राम कृष्णा दळवी यांना या ऍपद्वारे पहिला ऑनलाईन दाखला दिला. स्वतःचा ई ग्रामपंचायत मोबाईल ऍप विकसित करून डिजिटल इंडियाचीं संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढाकार घेणारी कोलगाव ग्रामपंचायत ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
स्मार्ट ग्रामपंचायत बरोबरच ई ग्रामपंचायत मोबाईल ऍप लोकांच्या सेवेत आणून डिजिटल क्षेत्रात ही या कोलगाव ग्रामपंचायतिने मोठी झेप घेतली आहे.
[web_stories title="true" excerpt="true" author="true" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="true" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="3" order="DESC" orderby="post_title" view="list" /]
-हेही वाचा