पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा वाढदिवस साजरा झाला. साऊथसह बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. किंग खान शाहरुखन याने देखील थलैवा रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. किंग खानने (Shahrukh Khan) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रजनीकांतसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघे दिसत आहेत. खास म्हणजे, दोघांचा हातात हात असून चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. (Shahrukh Khan)
हा फोटो शेअर करत शाहरुख खानने कॅप्शनमध्ये लिहिलं-"सबसे कूल, स्वॅगने भरपूर आणि नम्र स्टारोंचे स्टार रजनीकांत आपणास निरोगी आणि आनंददायी वाढदिवसाच्या शुभेच्छा.
शाहरुख खान (Shah Rukh Khan) च्या या पोस्टवर नेटकरी कमेंट करत आहेत. आणि आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं की, "एका प्रेमात दोन लीजेंड." तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं, "एका फोटोत दोन लिव्हिंग लीजेंड्स. रजनी सर आपणांस वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा."
केवळ शाहरुख खानचं नाही तर कमल हसन यांनीदेखील रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कमल हासन यांनी ट्विटरवर लिहिलं आहे, "माझ्या प्रेमळ मित्रा सुपरस्टार रजनीकांत यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. या शुभ दिनी तुम्हा यश मिळत राहो." तर धनुषने लिहिलं, "हॅप्पी बर्थडे थलाइवा."
शाहरुख खान २०२३ मध्ये मोठा धमाका करणार आहे. त्याचा जानेवारीत 'पठान' चित्रपट रिलीज होईल. जूनमध्ये शाहरुख 'जवान' चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल. 'डंकी' हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर रिलीज होईल.