Latest

KKRvsPBKS : रसेलच्या षटकारांपेक्षा आर्यन खान, अन्यना पांडेची चर्चा अधिक

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्जचा सहा गडी राखून पराभव केला. या सामन्यात कोलकाताच्या आंद्रे रसेलने मोठे षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मात्र, या सामन्यादरम्यान रसेलच्या षटकारांपेक्षा बॉलिवूडचा किंग खान आणि केकेआरचा मालक शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे यांचीच चर्चा होती.(KKRvsPBKS)

ह्या सामन्यादरम्यान अनन्या पांडे, शाहरुखची मुलगी सुहाना खान आणि मुलगा आर्यन खान कोलकता संघाला प्रोत्साहन देत या सामन्याचा मनापासून आनंद लुटला. पंजाबचे लागोपाठ गडी बाद झाल्याने सुरुवातीला सुहाना आणि अनन्या आनंद साजरा करत होत्या. यानंतर रसेलच्या धडाकेबाज खेळी पाहून या दोन तरूणी आनंदाने नाचत होत्या.

सामन्यात १३८ धावांचा पाठलाग करताना कोलकात्याने ५१ धावांत चार विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी शाहरूखची मुलगी सुहाना नाराज दिसली. मात्र, लवकरच रसेलने चौकार आणि षटकार ठोकले. आंद्रे रसेलने केलेल्या आतषबाजीने सुहाना खानच्या चेहऱ्यावर हसू उमटले.(KKRvsPBKS)

अनन्या पांडे यावेळी प्रथमच क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आली होती. शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान व मुलगी सुहाना खान यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये देखील त्यांनी सहभार नोंदवला होता. पहिल्यांदा सामना पाहण्यासाठी आलेल्या अनन्याला आर्यन खान सामन्यातीवेळी बारकावे समजवून सांगताना दिसत होता. यंदाच्या आयपीएलच्या हंगामात शाहरूख खान कोलकाताचा सामना पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित राहिलेला नाही.

शाहरूख पठाण चित्रपठाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सामन्याच्या सुरूवातीला नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा डाव १३७ डावात गुंडाळला. हे लक्ष्य कोलकाताने १४.३ षटकांतच पूर्ण केले. यावेळी आंद्रे रसेलने आपली नैसर्गिक खेळी करत ३१ चेंडूत दोन चौकार आणि ८ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७० धावांची धडाकेबाज फलंदाजी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT