Latest

Winter Session 2023 : लोकसभेत कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी गॅलरीतून मारली उडी

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेचे कामकाज सुरू असताना दाेन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारल्‍याची धक्‍कादायक घटना आज (दि.१३) दुपारी घडली. या प्रकारामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर दुपारी दाेन वाजेपर्यंत सहभागृहाचे कामकाज तहकूब करण्‍यात आले आहे. दरम्‍यान, संसदेवरील दहशतवादी हल्‍ल्‍याचा २२ व्‍या स्‍मृतिदिनीच झालेल्‍या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. आजच्‍या प्रकारामुळे संसदेची सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्‍याचा दावा विराेधी पक्षाचे सदस्‍य करत आहेत. Winter Session 2023

संसदेत लोकसभेत कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी स्मोक कँडल कशासाठी नेले होते. तर सुरक्षा रक्षकांकडून इतकी मोठी चूक कशी काय झाली ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, प्रेक्षक गॅलरीतून उडी मारणारा तरुण लातुरचा असून त्याचे नाव अमोल शिंदे असल्याचे समोर आले आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. चौकशीतून नेमके कारण समोर येणार आहे.

पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी नंतर प्रसारमाध्यमांना सांगितले की, एका तरुणाने गॅलरीतून उडी मारली तेव्हा तो खाली पडला असावा. त्यानंतर आणखी एका तरुणाने प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली. त्यापैकी एकाच्या हातात काहीतरी होते. ज्यातून पिवळा धूर निघत होता, तर दुसर्‍याच्या हातात काहीतरी होते, ज्याचा आवाज येत होता. यावेळी कोणतेही नुकसान झालेले नाही. तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . मात्र, प्रेक्षक गॅलरीतून उडी मारणे ही गंभीर बाब आहे. संसदेच्या सुरक्षेतील ही मोठी चूक आहे. चौकशी करून कारवाई केली जाणार आहे.

Winter Session 2023 दोन तरुणांनी गॅलरीतून मारली उडी

या घटनेबाबत माहिती देताना लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, "दोन तरुणांनी गॅलरीतून उडी मारली आणि त्यांच्याकडून काहीतरी फेकले गेले ज्यातून वायू बाहेर पडत होता. त्यांना खासदारांनी पकडले, त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले. सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. आज आम्ही 2001 मध्ये (संसदेवर हल्ला) बलिदान दिलेल्या लोकांची पुण्यतिथी साजरी केली. यानंतर झालेला हा प्रकार हा नक्कीच सुरक्षेचा भंग आहे. Winter Session 2023

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT