MP CM Oath Ceremony : मध्‍य प्रदेशमध्‍ये मोहन’राज’ला प्रारंभ, मुख्‍यमंत्रीपदी मोहन यादव शपथबद्ध | पुढारी

MP CM Oath Ceremony : मध्‍य प्रदेशमध्‍ये मोहन'राज'ला प्रारंभ, मुख्‍यमंत्रीपदी मोहन यादव शपथबद्ध

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्‍य प्रदेशच्‍या मुख्‍यमंत्रीपदी मोहन यादव यांनी आज (दि.१३) शपथ घेतली. मोतीलाल नेहरु स्‍टेडियमवर राज्‍यपाल मंगूभाई पटेल यांनी मोहन यादव यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. (MP CM Oath Ceremony) मध्‍य प्रदेश उपमुख्‍यमंत्रीपदी राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवरा यांनी शपथ घेतली.

शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्योतिरादित्य शिंदे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यांच्यासह भारतीय जनता पक्ष शासित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते.

MP CM Oath Ceremony : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते ते मुख्‍यमंत्री…

मोहन यादव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अगदी जवळचे मानले जातात. संघातील अनेक पदांवर त्यांनी दीर्घकाळ काम केले असून विद्यार्थी परिषदेतही त्यांनी काम केले आहे. ते दक्षिण उज्जैनचे आमदार आहेत. शिवराज सिंह सरकारमध्ये त्‍यांच्‍याकडे शिक्षणमंत्री पदाचा कार्यभार होता. २०१३ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. मोहन यादव हे ओबीसी प्रवर्गातून येतात.

उपमुख्‍यमंत्रीपदी शुक्ला आणि देवरा

मध्‍य प्रदेशच्‍या मुख्‍यमंत्रीपदी माेहन यादव यांच्‍या नावाची घाेषणा झाली. यानंतर राज्‍यात दाेन उपमुख्‍यमंत्री करण्‍याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतला होता. उपमुख्‍यमंत्रीपदी राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवरा यांच्‍या नावाची घाेषणा झाली हाेती.

हेही वाचा : 

Back to top button