मराठी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) सद्या खूप चर्चेत आहे. सायलीने आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर करताच तिच्या आणि चेन्नई सुपरकिंग्जचा धडाकेबाज युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंटचा धूमाकूळ घातला आहे.
काहीं दिवसांपूर्वी सायलीने Sayali Sanjeev इंन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला होता. तेव्हा ऋतुराजने 'Woahh' अशी कमेंट केली होती. तेव्हा सायलीनेही ऋतुराजच्या कमेंटला 'लव्ह' इमोजीचा रिप्लाय दिला होता. तेव्हा त्या दोघांच्या कमेंटस् वाचून दोघांच्या चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला होता. ऋतुराजची (Ruturaj Gaikwad) विकेट गेली, जमतयं वाटतं दोघांच अशा कमेंट येवू लागल्या.
सायली संजीवने काहीं फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केल्यापासून सायलीच्या आणि ऋतुराजच्या चाहत्यांच्या कमेंट करायला सुरूवात केली आहे. ऋतू पुण्यात आल्यामूळे साडीवर पाहण्याचा कार्यक्रम उरकून घेतला वाटतं, Mrs. Gaikwad, ऋतु का राज, गायकवाड बाई, सायली ऋतुराज गायकवाड (पुणेकर), नमस्कार गायकवाड वहिनी काय म्हणता ? कशा आहात ? लवकर लाडू वाटा आता !! अशा कमेंट येवू लागल्या आहेत.
सायली संजीवने अल्पावधीतच कलाविश्वात आपली ओळख निर्माण केली आहे. तिने झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिची 'काहे दिया परदेस' मालिकेतील 'गौरी' ची भूमिका प्रेक्षकांना भावली होती. तिची 'शुभ मंगल ऑनलाईन' ही मालिका सुध्दा खूप गाजली. सायलीने आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे.
सायली सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती नेहमी वेगवेगळ्या अंदाजातील फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते.
तिचा लवकरचं 'झिम्मा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. झिम्मा मध्ये ती हटके भूमिका करताना दिसणार आहे.