औंध ; पुढारी वृत्तसेवा वडी (ता. खटाव) येथे घरगुती वादातून युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. विशाल आप्पासो येवले (वय २४) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या विषयी मिळालेली अधिक माहिती अशी की, (बुधवार) रात्री वडी गावात बुधवारी रात्री घरगुती वादातून तुफान हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये विशाल आप्पासो येवले गंभीर जखमी झाला.
उपचारादरम्यान विशालचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच औंध पोलिसांनी चौंघांना ताब्यात घेतले आहे. एकाचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांपैकी दोन महिलांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान श्वानपथकासह गुन्हे अन्वेषणचे पथक रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा :