Latest

”नोटबंदी बद्दल केंद्र सरकारनं देशाची माफी मागायला हवी” : संजय राऊत

backup backup

नोटबंदी बद्दल केंद्र सरकारनं संपूर्ण देशाची माफी मागायला हवी, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. पुढं बोलताना त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावरही टीका केली.

जे. पी. नड्डा यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलंय महाविकास आघाडी सरकार उखडून फेका. जे. पी. नड्डांनी अगोदर कश्मीरमधील दहशतवादी उखडून फेकल पाहिजेत. आणि मग महाविकास आघाडी सरकारचं पाहाव, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नोटबंदीच्या निर्णयाला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. यावर बोलताना, केंद्र सरकारने नोटबंदी बद्दल देशाची माफी मागायला हवी अशी टीका केली आहे.

केंद्र सरकारने पाच वर्षापूर्वी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांना बंदी घातली होती. या निर्णयाला आजच्या दिवशी पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.

नोटबंदी निर्णयाला पाच वर्षे पूर्ण; आम्ही आता कोणत्या चौकात यावे?, नवाब मलिकांचा सवाल

नोटबंदीला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक सवाल केले आहेत. नोटबंदीमुळे देशात बेरोजगारी वाढली. अर्थव्यवस्थेचा कणा मोडल्याचा दावा मलिक यांनी केला. नोटबंदीमुळे देशातून आंतकवाद, काळा पैसा संपला का? असे सवाल त्यांनी केलेत.

नोटबंदी नंतर रांगेत उभे राहून अनेक लोकांचा जीव गेला. शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अर्थव्यवस्था कोलमडल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. चलनातून ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बाद केल्या. पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदी करत असल्याची जेव्हा घोषणा केली होती त्या भाषणात मोदींनी माझा हेतू चुकीचा वाटला तर मी चौकात उभा राहीन. देश जी शिक्षा करेल ती मी भोगेन, असे म्हटले होते. या पंतप्रधानांच्या घोषणेचा उल्लेख करत मलिक यांनी कुठे आहे तो चौक? असा सवाल केला.

समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा निशाणा…

दरम्यान, नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणी एक ट्विट करुन समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधलाय. "समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर हिचा ड्रग्जच्या व्यवसायात सहभाग आहे का? तुम्ही यावर उत्तर द्यायला हवे कारण तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे. हा पुरावा आहे." असे ट्विट मलिक यांनी केले आहे.

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT