Ayesha Omar-Shoaib Malik 
Latest

Sania Mirza divorce : सानिया मिर्जाचा पती शोएब मलिक सोबतच्या इंटिमेट फोटोशूटवरून पाकिस्तानी अभिनेत्रीने सोडले मौन

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : टेनिसपटू सानिया मिर्जा आणि तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमर हिने मौन सोडलं आहे. शोएब आणि आयेशा यांनी एका जाहिरातीसाठीबोल्ड फोटोशूट केले होते.(Sania Mirza divorce ) यावेळी शोएब-आयेशा फोटोशूटसाठी इंटिमेट सीन दिले होते. दरम्यान, सानिया मिर्जा आणि शोएब मलिक दोघांचे वैवहिक जीवन संपुष्टात आल्याची बातमी येऊन धडकली. त्यावेळी आयेशाचे नाव समोर आले. आयेशामुळेच सानियाचा संसार संपुष्टात आल्याच्या चर्चाही रंगल्या. आता पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमरने एका मुलाखतीत त्या जाहिरातीबद्दल खुलासा केला आहे. (Sania Mirza divorce)

शोएब आणि आयेशा यांच्यातील रिलेशनशीपवरून पसरलेल्या अफवांवर आयेशाने मौन सोडले आहे. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकला डेट करण्यावरून तिने खुलासे केले आहेत. एका मुलाखतीत ती म्हणाली, शोएब सोबतचा तो फोटोशूट जुना आहे. हेच कारण आहे की, लोक घटस्फोटाचे प्रकरण फोटोशूटशी का जोडत आहेत? ती म्हणाली, फोटोशूट हा एक प्रोफेशनल भाग आहे. पण, लोक हा रोमँटिक फोटोशूट असून अफेअरशी जोडत आहेत.

तिने हेदेखील सांगितले की, ती विवाहित लोकांच्या विवाहबाह्य अफेअरला अजिबात खतपाणी घालणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT