शर्लिनने काढले शाहरूखचे वाभाडे म्हणाली, तुझ्या आईने…

शर्लिनने काढले शाहरूखचे वाभाडे म्हणाली, तुझ्या आईने…
Published on
Updated on

आगामी 'पठाण' या चित्रपटामुळे शाहरूख खानला सध्या ट्रोल केले जात आहे. अशातच त्याचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून यात तो पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा देताना दिसत आहे. बॉलीवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने शाहरूखचा हा व्हिडीओ तिच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. कोणताही धर्म किंवा काम देशाची एकता, अखंडता यापेक्षा मोठे नसते, हे तुला तुझ्या आईने सांगितले नाही का, असे म्हणत शर्लिनने शाहरूखची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.

शर्लिनने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकर्‍यांनी कमेंटही केल्या आहेत. शाहरूखचा हा व्हिडीओ खूप वर्षांपूर्वीचा आहे. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकार, गायक व खेळाडूंना भारतात येण्यावर बंदी घालण्यात आली तेव्हा शाहरूखने याला विरोध केला होता. एवढेच नव्हे, तर पाकिस्तानी खेळाडूंचे त्याने तोंडभरून कौतुकही केले होते. आता त्याचा हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत असून त्यामुळे नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news