पुढारी ऑनलाईन डेस्क
दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु सध्या 'पुष्पा' चित्रपटातीलआयटम सॉन्ग 'उ अंतावा उ उ अंतावा'मुळे चर्चेत आहे. नुकताच या अभिनेत्रीविरोधात या गाण्याच्या बोलमुळे केस दाखल झालीय. इतकचं नाही तर हे गाणे बॅन करण्याची मागणीदेखील केली आहे. दरम्यान सामंथा रुथ प्रभुला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलीय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने रूग्णालयात जाऊन तपासणी केली असता सामंथाची कोविड चाचणी पॉझिटीव्ह आली. सामंथा १३ डिसेंबर रोजी एका प्रायव्हेट रुग्णालयात गेली होती. तेथे तिने कोविड-१९ टेस्ट केली. नंतर तिचा मॅनेजर महेंद्रने ती रूग्णालयात दाख झाल्याची अफवा असल्याचे स्पष्ट केले. कुणीही ही गोष्ट फार गांभीर्याने घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. तिला थोडा खोकला होता. त्यामुळे ती रुग्णालयात गेली होती. तेथे तिची कोरोना चाचमी करण्यात आली.
काल अभिनेत्री करिना कपूर, अमृता अरोरा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेतली. यामध्ये करण जोहरची चाचणी निगेटिव्ह आलीय. तर करिष्मा कपूर, मलायका अरोरा आणि आलिया भट्ट यांच्याही कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. करण जोहरच्या पार्टीनंतर अमृता अरोरा आणि करिना कपूर पॉझिटिव्ह आल्या आहेत.
दरम्यान, बीएमसीने दक्षता घेण्याचे आवाहन केले असून या सेलिब्रिटींच्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्यास सांगितले आहे.