Latest

Sayali Sanjeev : नाकात नथ, स्लिव्हलेसमध्ये सायलीचा लूक लयच भारी

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव ( Sayali Sanjeev) नेहमीच आपल्या मनमोहक अंदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. सध्या तिचा मराठमोळ्या लूकने पुन्हा सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. या फोटोवर चाहत्यांसह अनेक स्टार्सनी कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे.

अभिनेत्री सायली संजीवने ( Sayali Sanjeev) दोन दिवसापुर्वी पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहेत. या फोटोत पांढऱ्या साडीला लाल रंगाचे काठ आणि पदरावर निळ्या रंगाचे डिझाईन असल्याचे दिसत आहे. साडीसोबत खास करून तिने नाकात नथ आणि ब्लॅक रंगाचे स्लिव्हलेस ब्लॉउज परिधान करून तिच्या मेकअपने चार चॉद लावले आहेत. या ट्रॅडिशनल लूकमध्ये सायलीची अदा लाजाळू नवरीसारखी दिसतेय.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'सुंदर सुती पैठणीसाठी 'खूप खूप धन्यवाद ❤️?'. असे लिहिले आहे. या फोटोतील खास म्हणजे, लाजाळू पणासोबत स्लिव्हलेस ब्लॉउज आकर्षणाचा केंद्रबिदू ठरले. सायलीच्या या फोटोतील मनमोहक सौंदर्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. हा फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांसह मराठी कलाकारांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात चंद्रा म्हणजे, अभिनेत्री अमृता खानविलकर हिने 'दिलखेच अदा' असे म्हटले आहे. तर मंजिरी ओकने 'खुपच गोड ?' आणि अभिनेत्री क्षिती जोग हिने 'अतिशय सुंदर ??????' असे म्हटले आहे. एका युजर्सने 'पृथ्वीवरील सर्वात सुंदर स्त्री.. .❤️❤️❤️❤️', '❤️ lovely?', '❤️Very Beautiful❤️', 'Ohhh wooooow',. दुसऱ्या एका युजर्सने 'मनमोहक❤️', 'So cute' आणि 'So beautiful ???' यासारख्या अनेक कॉमेन्टस् केल्या आहेत. याशिवाय काही चाहत्यांनी हार्ट आणि फायरचा ईमोजी शेअर केले आहेत.

याआधी सायलीने गुलाबी रंगाच्या साडीतील आणि ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला होता. सायलीने अल्पावधीतच कलाविश्वात आपली ओळख निर्माण केली आहे. तिने झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिची 'काहे दिया परदेस' मालिकेतील 'गौरी' ची भूमिका प्रेक्षकांना भावली होती.

'शुभ मंगल ऑनलाईन' ही मालिका सुध्दा तिची खूप गाजली. सायलीने आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. सायली सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती नेहमी वेगवेगळ्या अंदाजातील फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT