jayshri patil 
Latest

सदावर्ते यांच्या पत्नी ॲड. जयश्री पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर

अविनाश सुतार

मुंबई, पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी ॲड. जयश्री पाटील यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान हा निर्णय आज (शनिवार) दिला.या निकालामुळे जयश्री पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानावर ८ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक करत हल्ला केला होता. या प्रकरणी जयश्री पाटील यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. मागील सुनावणीवेळी त्यांना अटकेपासून अंतरिम दिलासा मिळाला होता. शुक्रवारी (दि.२९) त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण झाला. या प्रकरणातील १११ आरोपींसह आरोपी वकील गुणरत्न सदावर्ते यांनादेखील मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. सर्व आरोपी जामिनावर सुटले आहेत. आता जयश्री पाटील यांनाही अटकपूर्व जामीन मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

  • पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या समाधीवर राज ठाकरे नतमस्तक७ एप्रिलरोजी सदावर्ते यांच्या इमारतीच्या छतावर मध्यरात्री झालेल्या बैठकीत शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचे नियोजन केले होते. सदावर्ते यांनी एसटी कामगारांच्या खटल्यासाठी मी फी घेतलेली नाही, असे अनेकवेळा म्हटले होते. मात्र, तपासात एसटी कामगारांकडून प्रत्येकी तीनशे रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच हे पैसे जयश्री पाटील यांच्याकडे दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जयश्री पाटील यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये, असा युक्तीवाद सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सुनावणीदरमम्यान केला.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT