पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये जलदगतीने १००० धावा पुर्ण करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. ऋतुराजने काल आयपीलमध्ये झालेल्या चेन्नई वि. हैदराबाद सामन्यादरम्यान सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याने आयपीएलमध्ये १००० धावा पुर्ण करण्यासाठी ४६ सामने खेळले आहेत. (Ruturaj Gaikwad)
मार्को जेन्सन टाकत असलेल्या सहाव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत त्याने आयपीएलमध्ये १००० धावा पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये जलदगतीने १००० धावा पूर्ण करण्यासाठी सुरेश रैनाने ३४ सामने खेळले होते. तर ऋषभ पंत आणि देवदत्त पडिकलने ३५ सामन्यांमध्ये १००० धावांचा टप्पा पार केला होता. ऋतुराज गायकवाडने हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात ५७ चेंडूमध्ये ९९ धावांची आक्रमक खेळी केली. (Ruturaj Gaikwad)
तर पहिल्या विकेटसाठी डेवॉन कॉन्वे बरोबर १८२ भागिदारी रचली. ही चेन्नई सुपर किंग्जसाठी आतापर्यंत सलामीवीरांनी केलेली सर्वांत मोठी भागिदारी आहे. पहिल्या अनेक सामन्यांमध्ये पराभवाच्या सामना करावा लागल्यानंतर सध्या धोनीच्या नेतृत्वात चेन्नई एक्स्प्रेस सुसाट धावू लागली आहे. पुण्याच्या महाराष्ट्र असोशिएशन स्टेडियमवर चेन्नई वि. हैदराबाद सामन्यात चेन्नईने दिमाखदार विजय मिळवला. तरीही चेन्नई सुपर किंग्ज हा संघ अंकतालिकेत ९ व्या स्थानावर आहे. (Ruturaj Gaikwad)