पुढारी ऑनलाईन डेस्क
प्रसिद्ध बुलेट मोटरसायकल तयार करणारी कंपनी रॉयल एनफील्डने (Royal Enfield) संभाव्य ब्रेक समस्येमुळे त्याच्या सर्वात लोकप्रिय क्लासिक ३५० (Classic 350) ह्या मॉडेलच्या २६,३०० युनिट्स मागे घेतल्या आहेत. खबरदारीचा उपाय कंपनीने हे पाऊल उचलले आहे. या मोटरसायकलींचे उत्पादन १ सप्टेंबर २०२१ ते ५ डिसेंबर २०२१ दरम्यान घेण्यात आले होते.
कंपनीने याबाबत सोमवारी सकाळी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला कळविले आहे. रॉयल एनफिल्डने ( (Royal Enfield) म्हटले आहे की, आमच्या टेक्निकल टीमला मोटरसायकलच्या एका भागामध्ये संभाव्य समस्या दिसून आली. रॉयल एनफिल्ड आपल्या उत्पादनांबद्दल मजबूत टेस्टिंग आणि डेव्हलमेंट प्रक्रियेचे पालन करते. पण असे आढळून आले की ब्रेक पेडलवर असलेल्या अधिक ब्रेकिंग लोडमुळे ब्रॅकेटचे संभाव्य नुकसान होऊ शकते. ज्यामुळे ब्रेकचा आवाज येऊ शकतो आणि ब्रेकिंग कार्यक्षमतेत संभाव्य बिघाड होऊ शकतो.
रॉयल एनफील्डची क्लासिक ३५० ही बहुप्रतिक्षित मोटरसायकल आहे. हल्लीच ती बाजारात लाँच केली होती. पण ब्रेक समस्येमुळे ती आता मागे घेण्यात आली आहे. क्लासिक ३५० ही मोटरसायकल सिंगल चॅनेल एबीएस व्हेरिएंट आणि ड्युअल-चॅनेल एबीएस व्हेरिएंटमध्ये बाजारात आणली होती.
हे ही वाचा :