रिचाच्या हातावर रंगली अलीच्या नावाची मेहंदी  
Latest

Richa Chadha Wedding: रिचाच्या हातावर रंगली अलीच्या नावाची मेहंदी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडची बिनधास्त अभिनेत्री रिचा चड्ढाच्या हातावर अली फजलच्या नावाची मेहंदी रंगलीय. (Richa Chadha Wedding) कोरोना महामारीमुळे दोघांचे लग्न होऊ शकले नाही. अखेर, दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाचे विधीही सुरु झाले आहेत. ऋचाचा मेहंदी सोहळा देखील पार पडला आहे. तिने सोशल मीडियावर मेहंदी दाखवत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या मेहंदीत अलीचे नाव दिसत आहे. (Richa Chadha Wedding)

नजर होऊन नये म्हणून तिने बट्टूचेल आर्ट देखील बनवले आहे. अली फजलच्या प्रीवेडिंग फंक्शनमध्ये मेहंदी सेरेमनी काल होती. या सोहळ्यात जवळची मित्रमंडळी आणि कौटुंबिक मंडळी उपस्थित होती. तिच्या हातावरील लावलेली मेहंदीची डिझाईन युनिक आहे. रिचाच्या हातावर कमळाच्या फुलाचे डिझाईन केले गेले आहे. हातावर मधोमध आपल्या आणि अलीच्या नावाचे पहिले अक्षर लिहिले आहे. रिचाने मोठी डिझाईन काढलेली नाही. केवळ हाताच्या मागे सिंपल डिझाईन तयार केलं आहे.

रिचा आणि अलीची पहिली भेट २०१७ मध्ये 'फुकरे' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघे अनेक वर्षे रिलेशनशीपमध्ये आहेत.

रिचा-अली २०२० मध्ये लग्न करणार होते. पण, कोरोनामुळे लग्नाची तारीख पुढे ढकलली गेली. आगामी प्रोजेक्टविषयी बोलायचं झालं तर अली फजल हॉलीवूडपट 'डेथ ऑन द नाईल' आणि 'कंधार' मध्ये दिसणार आहेत. तर सध्या अली प्रसिद्ध वेब सिरीज 'मिर्जापूर ३' चे शूटिंग करत आहे. तर रिचा 'अभी तो पार्टी शुरू हुई है' आणि 'हीरा मंडी' वेब सिरीजमध्ये दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT