पुणे : कात्रज संघाच्या दूध तपासणी मशिनचे उद्घाटन | पुढारी

पुणे : कात्रज संघाच्या दूध तपासणी मशिनचे उद्घाटन

पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वरंवड (ता. दौंड) येथील दूध शीतकरण केंद्रात दुधाची गुणप्रत तपासण्यासाठीचे मिल्को स्क्रीन मशिन बसविण्यात आले आहे. या मशिनचे उद्घाटन कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष राहुल दिवेकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या मशिनद्वारे दुधाची फॅट, एसएनएफ, प्रोटीन माहिती मिळते.

तसेच दुधातील पाणी, साखर, युरिया, माल्टोज, अलोनियम सल्फेट आदींची भेसळ दुधात असल्यास लगेच दाखविले जाते. असे भेसळीचे दूध आढळल्यास ते नाकारण्यात येते. ज्यामुळे कात्रज दूध संघाला स्वच्छ, निर्भेळ दूध प्राप्त होईल, यास प्राधान्य देण्यात येत आहे. ही मशिन डेन्मार्क या देशात तयार झालेली असून तिची किंमत 5 लाख 11 हजार 530 रुपये आहे. या वेळी शीतकरण केंद्राचे प्रमुख उत्तम आखाडे, शरद येरोळकर, नामदेव पांगारकर व दूध केंद्रातील सेवक उपस्थित होते.

Back to top button