RBI Assistant Recruitment : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. आरबीआयने एक अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये सहाय्यक पदासाठी (Assistant 2021) अर्ज करता येणार आहे. विविध भागांमध्ये असलेली 950 सहाय्यक पदे भरण्यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
यासाठी आरबीआयची अधिकृत वेबसाइट www.rbi.org.in यावरून अर्ज करता येईल. यामध्ये पात्र उमेदवार 17 फेब्रुवारी ते 8 मार्च 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ऑनलाइन परीक्षा होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी, आरबीआय सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करते. मात्र, ही २०२१ ची भरती प्रक्रिया आहे.
RBI Assistant Recruitment पहा जागाबाबत तपशील
- पद : असिस्टंट
- रिक्त संख्या : 950
- अधिसूचना जारी झाल्याची तारीख : 17 फेब्रुवारी 2022
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील किमान ५० % गुणांसह पदवी असावी.
- SC/ST/PWD उमेदवारांसाठी, पदवीचे किमान उत्तीर्ण गुण असावे.
- माजी सैनिक उमेदवारांना कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्यांनी सशस्त्र दल परीक्षा उत्तीर्ण असावी आणि किमान 15 वर्षे संरक्षण सेवा आवश्यक आहे.
- एखाद्या विशिष्ट राज्यातून किंवा प्रदेशातून अर्ज करणार असल्यास, त्या विशिष्ट प्रदेशाची प्रादेशिक भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे आवश्यक
वयोमर्यादा
- अर्जदाराचे वय 01/12/2021 रोजी 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असायला हवे.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाची सवलत सरकारी नियमांनुसार लागू होईल.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.