पुढारी ऑनलाईन डेस्क
भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीबाबत ( Ravi Shastri and virat kohli ) मोठा खुलासा केला आहे. विराट हा सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. त्याचबरोबर त्याला टी-20 आणि वन डे क्रिकेटचे कर्णधारपदही सोडावे लागले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रोहित शर्मा याच्याकडे वनडेचे कर्णधारपद दिले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, २०१४ मध्ये भारतीय संघ हा इंग्लंड दौर्यावर होता. यावेळी विराट कोहलीचा फॉर्म खूपच बिघडला होता. हा त्याच्यासाठी मोठा धक्का होता. त्यावेळी विराट हा मानसिक तणावाखाली गेला. या काळात धावा करण्यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागत होता. इंग्लंडच्या या दौर्यात विराटने ५ कसोटी सामन्यातील डावांमध्ये अनुक्रमे १, ८, २५, ०, ३९, २८, ०, ७, ६ आणि २० अशा धावा केल्या होत्या.
विराट याने हळूहळू पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीमध्ये सुधारणा केली. प्रत्येक दिवस त्याच्यामधील आत्मविश्वास वाढत गेला. इंग्लंडनंतर झालेल्या ऑस्ट्रेलिया दौर्यात विराटने धमाकाच केला. तब्बल ८६.५० च्या सरासरीने त्याने ६९२ धावा केल्या. यामध्ये चार शतकांचा समावेश होता. यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही, असेही शास्त्री यांनी सांगितले.
माझी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली. यावेळी कोणाशी संवाद साधावा, हे माझ्यासमोर मोठे आव्हान होते. विराट कोहली हा यासाठी फरफेक्ट खेळाडू होता. कारण विराट व्यक्तिमत्व आणि खेळ हा महेंद्रसिंग धोनी याच्यासारखेच आहे. अवघ्या दोन ते तीन महिन्यांमध्ये माझा विराटबरोबरील संवाद वाढला. आम्ही फलंदाजीच्या तंत्रासह क्रिकेटच्या विविध मुद्यांवर सखोल चर्चा केली, असेही शास्त्री यांनी म्हटलं आहे.
हेही वाचलं का?