Ashes : पहिल्‍या कसोटीत इंग्‍लंडचा धुव्‍वा, ऑस्ट्रेलियाची 'ॲशेस'मध्ये आघाडी | पुढारी

Ashes : पहिल्‍या कसोटीत इंग्‍लंडचा धुव्‍वा, ऑस्ट्रेलियाची 'ॲशेस'मध्ये आघाडी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस ( Ashes ) मालिकेतील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून जिंकला. इंग्लंडकडून मिळालेले 20 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात एक विकेट गमावून पूर्ण केले.

इंग्लंडला पहिल्या डावात 147 तर दुसऱ्या डावात 297 धावाच करता आल्या. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 425 धावा करत चांगली आघाडी घेतली होती. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात विजयासाठी फक्त 20 धावांची गरज होती. हे टार्गेट ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्स राखून आरामात पूर्ण केले. शतकी खेळी करणार्‍या ट्रॅव्‍हिस हेडला याला सामनावीर म्‍हणून गौरविण्‍यात आले आहे.

Ashes : ऑस्ट्रेलियाने घेतली 1-0 अशी आघाडी…

ॲशेस ( Ashes ) मालिकेत 5 सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया आता 1-0 ने आघाडीवर आहे. उभय संघांमधील दुसरा सामना 16 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात इंग्लंडने विजयाची नोंद केली तर मालिकेत चुरस वाढणार आहे.

नॅथन लायनचे ४०० विकेट्‍स पूर्ण

ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 400 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. ऑफस्पिनर लायन हा 400 बळी घेणारा ऑस्ट्रेलियाचा तिसरा गोलंदाज ठरला आहे.

हेही वाचलं का? 

 

Back to top button