पुढारी ऑनलाईन डेस्क : लग्नाच्या धामधुमीत मराठी लग्नाचा सध्या सीझन सुरु आहे. (Krutikaa Tulaskar wedding video) अभिनेता हार्दिक जोशी-अक्षया देवधर पाठोपाठ, सुमित पुसावळे-मोनिका महाजन, हरीश दुधाडे-समृद्धी निकम यांच्या लग्नानंतर आता आणखी एका जोडीने लग्नगाठ बांधलीय. रात्रीस खेळ चाले दुसऱ्या भागातील शेवंता अर्थातच कृतिका तुळसकर ही विवाहबद्ध झाली. तुम्हाला माहितीये का, तिने कोणाशी लग्नगाठ बांधलीय? (Krutikaa Tulaskar wedding video )
कृतिका आणि विशालने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील काही खास प्रसंगाचे व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये तिने विधी आणि सप्तपदीचे व्हिडिओ अपलोड केले आहेत.
तिने एका व्हिडिओला कॅप्शन लिहिलीय- 'आमच्या लग्नात मी आणि विशालने जे काही सुंदर कपडे घातलेत ते दीपाने आमच्या मैत्रिणीने बनवले होते. तिला काही सांगायची गरजचं आम्हाला लागली नाही. तिने आमचा स्पेशल डे अजून स्पेशल बनवला. आमचे सगळे लग्नाचे कपडे स्वतःच्या हाताने आणि प्रेमाने तयार करण्यासाठी खूप खूप खूप thank you. आणखी एक व्हिडिओ शेअर करत तिने विधी असं लिहिलं आहे. या दोघांना वैवाहिक सुखी जीवनासाठी खूप शुभेच्छा चाहत्यांनी दिल्या आहेत.
दिग्दर्शक विशाल देवरुखकर दिग्दर्शक आहे. मराठी चित्रसृष्टीत कृतिकाची त्याच्याशी ओळख झाली. सुरुवातीला मैत्री आणि नंतर लग्न. विशाल देवरुखकरने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. बॉईज, बॉईज २, गर्ल्स या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यानं केलं आहे.