पुढारी ऑनलाईन डेस्क
आरआरआर चित्रपट २५ मार्च, २०२० रोजी रिलीज होतोय. या चित्रपटाच एनटीआर ज्युनियर, अजय देवगण, आलिया भट्ट आणि साऊथ स्टार राम चरण (Ram Charan) यांच्या मुख्य भूमिका आहेत. एस एस राजमौलीच्या या चित्रपटात राम चरण (Ram Charan) रामाराजूच्या भूमिकेत आहे. राम चरण याने आपले वडील आणि लोकप्रिय अभिनेते चिरंजीवी यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत साऊथमध्ये लोकप्रियता मिळवलीय. तुम्हाला माहिती आहे की, राम चरण हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथे कोटींच्या बंगल्यात राहतो. त्याची स्वत:ची एअरलाईन कंपनीदेखील आहे. जाणून घेऊया त्याच्याविषयी.
साऊथ सुपरस्टार चिरंजीवीचा मुलगा राम चरण साऊथ चित्रपटातील अशा स्टार्सपैकी एक आहे, ज्याने वडिलांच्या स्टारडमशिवाय जगात विशेष ओळख निर्माण केली आहे. राम चरण लक्झरी लाईफस्टाईलविषयी सांगायचं झाल्यास तो रॉयल लाईफ जगतो. हैदराबादच्या प्राईम लोकेशनवर त्याचा कोटींचा बंगला आहे.
साऊथचा सुपरस्टार राम चरणचा जन्म २७ मार्च, १९८५ रोजी रोजी चेन्नई येथे झाला. त्याने २००७ मध्ये पुरी जगन्नाध यांच्या 'चिरुथा' चित्रपटातून पदार्पण केले. त्याने २०१६ मध्ये 'कोनिडेला प्रोडक्शन कंपनी' नावाने आपले प्रोडक्शन हाऊस उघडले. रामचरण हा एका विमान कंपनीचा मालक आहे. याशिवाय हैदराबाद पोलो रायडिंग क्लब नावाची पोलो टीमही आहे.
राम चरणचं घर खूप सुंदर आहे. त्याच धर अनेक परदेशांतून खरेदी केलेल्या वस्तूंनी सजवलेले आहे. त्याचं घर अलिशान आहे. घराच्या बाल्कनीतून सुंदर दृश्य दिसतं. रामचे फॅन फॉलोइंगदेखील त्याचे सुपरस्टार वडील चिरंजीवीसारखं आहे. फॅन्स त्याच्या अभिनयाशिवाय त्याचं फिटनेस आणि स्टाईलचे वेडे आहेत. चित्रपटांशिवाय तो ब्रँड एंडोर्समेंट्स आणि पर्सनल इन्वेस्टमेंट्समधून पैसे कमावतो.
रामचरणने बॉलिवूडमध्ये एकच चित्रपट केला. अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट 'जंजीर'च्या रिमेकवर याच नावाने २०१३ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटात त्याने प्रियांका चोप्रासोबत काम केलं होतं. पण, हा चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर तो कुठल्याही बॉलिवूड चित्रपटात दिसला नाही.
हा चित्रपट ८ जानेवारी २०२१ रोजी रिलीज होणार होती. पण, कोरोनामुळे हा चित्रपट रिलीज होऊ शकला नव्हता.