Latest

२६ जानेवारी आणि ट्रॅक्टरही दूर नाहीत; राकेश टिकैत यांचा इशारा

backup backup

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन:  सरकारने किमान हमी भावावर कायदा करावा, अन्यथा आम्ही इथेच आहोत, आमचे ट्रॅक्टरही इथेच आहे आणि २६ जानेवारीही दूर नाही, असा इशारा राकेश टिकैत यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या प्रखर विरोधानंतर तीन कृषी कायदे मागे घेत शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, जोपर्यंत एमएसपीचा कायदा होत नाही आणि शेतकरी आंदोलनात बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचे जाहीर केले आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात कृषीमंत्री नरेंद्र तोमर कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक पटलावर मांडणार आहेत. मात्र, केवळ कृषी कायदे मागे घेऊन चालणार नाही तर एमएसपीवर कायदा करा, अशी आग्रही मागणी शेतकरी आंदोलनाने केली आहे.

मुंबईत आयोजित किसान सभेला संबोधित करण्यासाठी शेतकरी नेते राकेश टिकैत आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना सरकारला इशारा दिला आहे.

ते म्हणाले, ' आम्हाला दहशतवादी ठरवले. आम्हाला देशद्रोही ठरवले मात्र, आम्हाला त्याचा फरक पडला नाही. आम्ही एकत्र आहोत, आम्ही आमचे मुद्दे मांडत राहिलो. आम्हाला दहशतवादी घोषित करून तुरूंगात टाका. भारत सरकारने आपले डोके तपासून ठीक करून घ्यायला हवे. त्यांची गुंडागिरी आता चालणार नाही.

वर्षभर शेतकऱ्यांनी खूप सहन केले आहे. आता तरी डोके तपासून ठीक करून एमएसपीवर हमी कायदा तयार करावा. आम्ही गेले वर्षभर आहोत तिथेच आहोत, तआ २६ जानेवारी काही दूर नाही मग. आणि देशातील शेतकऱ्यांचे चार लाख ट्रॅक्टरपण इथेच आहेत. आता तरी चर्चा करा, शेतकरी तुम्हाला सैल सोडणार नाहीत.'

किसान मजदूर महापंचायतीत टिकैत यांनी मोदी सरकारवर टीका केली. 'सरकार दगा देत आहे. त्यामुळे सतर्क राहण्याची गरज आहे. अजूनही सरकार चर्चा करायला तयार नाही. मोदी सरकार षडयंत्र रचनारे, बेईमान आणि फसवे आहे. शेतकरी आणि कामगारांना कमी दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहे.' अशी जोरदार टीका केली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT