Latest

भारताला इस्‍लामिक देश बनवण्‍याचा कट : ‘पीएफआय’ विरोधात ‘एनआयए’चे पहिले आरोपपत्र दाखल

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) ही २०४७ पर्यंत भारताला इस्‍लामिक राष्‍ट्र बनवण्‍याचा कट रचला आहे. या साठी या संघटनेकडून मुस्‍लिम युवकांची दिशाभूल सुरु आहे. त्‍यांना सशस्‍त्र प्रशिक्षणही दिले जात आहे, असे 'पीएफआय' सदस्‍य असणार्‍या दोन आरोपींविरोधात दाखल दोषारोपपत्रात राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने ( एनआयए ) म्‍हटले आहे.

सप्‍टेंबर २०२२ मध्‍ये 'एनआयए'ने 'पीएफआय'चा मोठा कट उघड केला होता. भिन्‍न समुदायांमध्‍ये व्‍देष निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न या संघटनेकडून सुरु असून, मुस्‍लिम युवकांची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न सुरु असल्‍याचे उघड झाले होते. या प्रकरणी 'एनआयए'ने राजस्‍थानमधील कोटा येथील मोहम्‍मद आशिफ उर्फ ​​आसिफ आणि बारन येथील सादिक सराफ या दोघांना अटक केली होती. दोघेही आरोपी 'पीएफआय'चे प्रशिक्षित सदस्य आहेत. दोघेही मुस्‍लिम तरुणांची दिशाभूल करुन त्‍यांना सशस्‍त्र प्रशिक्षण देत होते, असेही दोषारोपपत्रात स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

भारतात इस्लाम धोक्यात आहे. त्याचे संरक्षण करण्यासाठी, २०४७ पर्यंत भारतात इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल. यासाठी अधिकाधिक लोकांनी पीएफआयमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. तत्सम अनेक गोष्टी करून हे आरोपी तरुणांना भरती करायचे आणि नंतर त्यांना शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण देत होते, असेही 'एनआयए'च्‍या दोषारोपपत्रात म्‍हटले आहे.
'पीएफआय'चे हिंसाचाराला खतपाणी

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची ( PFI) ची स्थापना २२ नोव्हेंबर २००६ रोजी तीन मुस्लिम संघटनांच्या बैठकीत झाली. यामध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ केरळ, कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी आणि तामिळनाडूच्या मनिता नीती पसाराय एकत्र आले. पीएफआयमध्ये किती सदस्य आहेत याची माहिती संस्था देत नाही. 2012 मध्ये केरळ सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले होते की, 'पीएफआय' ही बंदी घातलेली संघटना ही स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) चे नवीन स्वरूप आहे. 'पीएफआय'च्या कामगारांवर अल-कायदा आणि तालिबानसारख्या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सीएए कायद्याबाबत देशात गदारोळ सुरू असताना या संघटनेवर हिंसाचार भडकवण्याचे गंभीर आरोप झाले होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT