Stock Market Closing | शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी घसरला, IT स्टॉक्सना फटका, गुंतवणूकदारांचे ६.५ लाख कोटी बुडाले

Stock Market Closing | शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी घसरला, IT स्टॉक्सना फटका, गुंतवणूकदारांचे ६.५ लाख कोटी बुडाले
Published on
Updated on

Stock Market Closing : जागतिक बाजारातून कमकुवत संकेत आहे. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी (दि.१४) भारतीय शेअर बाजाराने स्थिर सुरुवात केली होती. त्यानंतर काही वेळातच सेन्सेक्स २०० अंकांनी वाढून ५८,४०० वर पोहोचला होता. पण ही तेजी अधिक वेळ टिकून राहिली नाही. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास सेन्सेक्स ३२० अंकांनी घसरला. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास सेन्सेक्स ४५० अंकांपर्यत घसरला. तर निफ्टी १७ हजारांच्या खाली आला होता. निफ्टी १७ हजारांच्या खाली येण्याची ऑक्टोबर २०२२ नंतरची ही पहिलीच वेळ आहे. आज दिवसभर पुन्हा शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. त्यानंतर सेन्सेक्स ३३७ अंकांनी घसरून ५७,९०० वर बंद झाला. तर निफ्टी १११ अंकांच्या घसरणीसह १७,०४३ वर स्थिरावला. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही दोन्ही निर्देशांक घसरल्याने गुंतवणूकदारांचे सुमारे ६.५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल २६२.९४ लाख कोटी रुपयांवरून २५६.५ लाख कोटींपर्यंत खाली आले आहे.

हे होते टॉप गेनर्स, टॉप लूजर्स

आजच्या व्यवहारात IT आणि PSU बँकिंग स्टॉक्सना सर्वाधिक फटका बसला. हे स्टॉक्स सुमारे २ टक्क्यांनी खाली आले. इंडसइंड बँक, टायटन, बीपीसीएल, सन फार्मा, लार्सन या शेअर्सनी वाढून व्यवहार केला. तर टेक महिंद्रा, एम अँड एम, एचसीएल टेक, अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायजेस हे टॉप लूजर्स होते.

IT स्टॉक्स घसरले

IT स्टॉक्स आज २ टक्क्यांनी घसरले. यात कोफोर्ज (-४.२७ टक्के), MphasiS (-२.६९ टक्के), पर्सिस्टंट सिस्टम्स (-२.३२ टक्के), टेक महिंद्रा (-२.०९ टक्के), एचसीएल टेक्नॉलॉजीस (-१.९७ टक्के), एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस (-१.५५ टक्के), विप्रो (-१.४८ टक्के), टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (-०.७७ टक्के), इन्फोसिस (-०.८० टक्के) यांचा समावेश होता.

अदानी स्टॉक्स ७ टक्क्यांपर्यंत घसरले

आजच्या व्यवहारात अदानी स्टॉक्स ७ टक्क्यांपर्यंत घसरले. अदानींच्या सर्व १० स्टॉक्सनी आज रेड झोनमध्ये व्यवहार केला. अदानी समूहातील प्रमूख अदानी एंटरप्रायजेसचा शेअर ७.७० टक्क्यांपर्यंत घसरून १,७२९ रुपयांवर आला. एनडीटीव्ही, अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी विल्मर हे ५ टक्क्यांपर्यंत घसरले.

सिलिकॉन व्हॅली बँक बंद, आशियाई बाजार गडगडले

अमेरिकेतील बँकिंग क्षेत्र संकटात आहे. अमेरिकेतील बँकांना एकामागून एक असे टाळे ठोकले जात आहेत. आधी सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) नंतर आता सिग्नेचर बँक बंद करण्यात आली आहे. सिग्नेचर बँकेकडे क्रिप्टोकरन्सीचा स्टॉक होता. क्रिप्टोकरन्सीमधील धोका लक्षात घेता ही बँक तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार चिंतेत असून याचे पडसाद शेअर बाजारात दिसून येत आहेत. याचा फटका अमेरिकेसह बहुतांश आशियाई बाजारांना मंगळवारी बसला.

जपानचा टॉपिक्स निर्देशांक २.६७ टक्के घसरला. तर निक्केई २.२ टक्के घसरून २७,२२२ पर्यंत खाली आला. दक्षिण कोरियाचा कोस्पी देखील २.५६ टक्क्यांनी खाली आला आहे. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक २.१५ टक्के घसरला आहे. तर चीनचा शांघाय कंपोझिट ०.३ टक्के घसरला आहे. (Stock Market Closing)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news