हैदराबाद; पुढारी ऑनलाईन : निसर्गाची किमया अदभूत असते. आपण कितीही म्हणालो की, ज्या निसर्गात आपण राहत आहोत त्याला आपण ओळखले पण, अद्याप शक्य झाले नाही. माणूस म्हणून या पृथ्वीवर उत्क्रांती झाल्यापासून सुद्धा मानवाने या निसर्गाला पुरता ओळखलेले नाही. कितीही आधुनिक प्रगती झाली, नवनवे शोध लागले तरीही हा निसर्ग जी किमया दाखवतो ते समजून घेण्यासाठी आपण तोकडेच पडतो. अखेर या निसर्गाचाच आपणसुद्धा भाग असून त्याच्याकडून घडणाऱ्या चमत्काराला पाहूण फक्त आनंद घ्यायचा एवढेच. अशीच एक निसर्गाची अदभूत किमया तेलंगणा राज्यात घडली आहे. सर्वत्र सध्या तुफान पाऊस बरसत आहे. पाऊस म्हटला की मुसळधार, वादळ, वारे आणि कधी कधी गारांचा पाऊस हे साहजिकच आपणास माहित आहे. कधीतरी विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये काळा पाऊस पडला असेही वाचले आहे. पण, या तेलंगणात चक्क माशांचा पाऊस (Raining Fish In Telangana) पडल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे.
वर म्हटल्याप्रमाणे निसर्गाची किमया अगाध आहे. हा निसर्गाचा एक प्रकारे चमात्कारच तेलंगणात पहायला मिळाला. तेलंगणातील जगतीयल जिल्ह्यामधील साईनगर परिसरात चक्क माशांचा पाऊस पडला (Raining Fish In Telangana) आहे. या पावसानंतर ठिकठिकाणी माशांचा खच पडल्याचे पहायला मिळाले. येरवी आपण मासे खाण्यासाठी तडफडत असतो. हे मासे पकण्यासाठी मच्छीमारी करणाऱ्यांना काय व्याप करायला लागतो हे आपणास माहित आहे. तसेच अव्वाच्या सव्वा रुपये देऊन हे मासे खाणे देखिल आपल्या खिशाला परवडत नाही. पण, या तेलंगणातील साईनगरमध्ये लोकांच्या दारात माशांचा पाऊस पडल्याने सारेच जण त्यांच्यावर तुटून पडले. जो तो जे सापडेल ते भांडे घेऊन हे मासे गोळा करताना दिसू लागला होता. या निसर्गाच्या चमत्कारला समजून घेण्यापेक्षा येथील नागरिकांनी मासे गोळाकरण्यालाच अधिक महत्त्व दिल्याचे पहायला मिळाले.
याबाबत हवामान तज्ज्ञांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की, ही एक सर्वसामान्य पण, कधीतरी घडणारी विलक्षण घटना आहे. कधी कधी अशापद्धतीने माशांचा पाऊस (Raining Fish In Telangana)पडतो. अन्य देशांमध्ये अशा पद्धतीने माशांचा पाऊस पडलेला आहे. जोरदार पाऊस व वादळ आणि वारे यामुळे समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होते. या चक्रीवादळादरम्यान समुद्रातील छोटे मासे, बेडुक चक्रीवादळात सापडून वर जातात. जेथे या चक्रीवादळाच्या प्रभावाने पाऊस पडतो तेथे या माशांचा वर्षाव होतो आणि आपल्यासाठी तो माशांचा पाऊस असतो. २०२१ मध्ये अमेरिकेतील टेक्सास शहराजवळ अशीच घटना घडली होती. येथे देखील माशांचा पाऊस पडला होता.
अधिक वाचा :