Daler Mehndi Arrested : गायक दलेर मेहंदी यांना दोन वर्षांचा कारावास; मानवी तस्करीत आढळले दोषी | पुढारी

Daler Mehndi Arrested : गायक दलेर मेहंदी यांना दोन वर्षांचा कारावास; मानवी तस्करीत आढळले दोषी

चंदीगढ; पुढारी ऑनलाई : पंजाबचे लोकप्रिय गायक दलेर मेहंदी (Daler Mehndi Arrested) यांना २ वर्षाची शिक्षा पंजाबच्या पटियाला कोर्टाने सुनावली आहे. यामुळे पंजाबच्या सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये देखील खळबळ उडाली आहे. मानव तस्करी केसमध्ये दलेर मेहंदी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पटियाला कोर्टाने गुरुवारी या आधी दिलेल्या शिक्षेला कायम ठेवले.

दलेर मेहंदी यांची कारागृहात रवानगी (Daler Mehndi Arrested)

न्यायालयाने निर्णय सुनावल्या नंतर कोर्टातच दलेर मेहंदी यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांना कारागृहात पाठविण्यात आले. पटियाला कोर्टाने सुनावणी दरम्यान दलेर मेहंदी यांना दाषी ठरवले त्यानंतर आधीचा निर्णय कायम ठेवला. ही घटना २००३ सालची आहे, मानव तस्करीसह दलेर मेहंदी व त्यांच्यावर भावावर ३१ खटले दाखल करण्यात आले होते.

लोकांना अवैधरित्या परदेशात पाठविण्याचा आरोप (Daler Mehndi Arrested)

२००३ मध्ये याबाबत खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर लोकांना अवैधरित्या परदेशात पाठविण्याचा आरोप लाविण्यात आला होता. असे करण्यासाठी दलेर मेहंदी यांनी लोकांकडून भरपूर पैसे घेतले होते, असे म्हटले जाते. १९९८ व १९९९ दरम्यान दलेर मेहंदी यांनी १० लोकांना अवैधरित्या सॅनफ्रॅन्सिसको आणि न्यूजर्सी येथे पाठवले होते. यानंतर दलेर मेहंदी आणि त्यांचे दिवंगत भाऊ शमशेर सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल होताच दोन्ही भावांच्या विरुद्ध ३५ तक्रारी समोर आल्या होत्या.

परदेशात पाठविण्यासाठी घ्यायचे एक कोटी रुपये (Daler Mehndi Arrested)

हे दोघे भाऊ परदेशात घेऊन जाण्यासाठी प्रवाशांकडून १ कोटी पर्यंतची रक्कम घेत होते. पण, लोकांच्या तक्रारीनुसार जर हे काम झाले नाही, तर ते पैसे देखिल परत करत नव्हते. २००६ मध्ये दिल्लीमधील कॅनॉट प्लेस येथील त्यांच्या कार्यालयात छापा मारण्यात आला होता. तेव्हा त्या कार्यालयातून अनेक कागदपत्रे तसेच पैसे सापडले होते. २०१८ मध्ये पटियाला कोर्टाने दलेर मेहंदी यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. परंतु, शिक्षा सुनावल्यानंतर अगदी ३० मिनिटाच्या कालावधीतच कोर्टाने त्यांचा जामीन देखील मंजुर केला होता.

दलेर मेहंदी एक सुप्रसिद्ध गायक आहेत. त्यांनी रसिकांना आपल्या पंजाबी व हिंदी गाण्यांवर थिरकायला लावले आहे. आज सुद्धा लोकांमध्ये त्यांची गीते फेमस आहेत. पार्टी आणि लग्न समारंभामध्ये दलेर मेहंदी यांची गीते डीजे अगदी थाटात वाजवतात.

Back to top button