file photo 
Latest

Railway Jobs 2021: महिलांना सुवर्णसंधी, स्पोर्ट्स कोट्यातून निघाली भरती

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क :  (Railway Jobs 2021) पश्चिम रेल्वेने ग्रुप सी साठी भरती काढली आहे. रेल्वे भरती सेल ने स्पोर्टस् कोट्याद्वारे प्रशासन आणि इतर क्षेत्रातील विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. महिला आणि पुरुष दोन्ही या जागांसाठी अर्ज करु शकतात.

(Railway Jobs 2021) स्पोर्टस् कोट्याअंतर्गत एकुण २१ जागांसाठी भरती आहे. ज्यामध्ये स्तर ४/५ साठी ५ पदांसाठी भरती होणार आहे. यात महिलांसाठी ॲथलेटिक्स १, हॉकी २, आणि बास्केटबॉल १ या पदांसाठी भरती होणार आहे.

पुरुषांमध्ये हॅन्डबॉल १ पदासाठी भरती होणार आहे.

लेवल २/३ साठी १६ पदांची भरती

(Railway Jobs 2021) पुरुषांसाठी ॲथलेटिक्स मध्ये ३, बास्केटबॉल १, डाइविंग मध्ये १, फ्रीस्टाईल कुस्ती १, हॅन्डबॉल २, वॉटर पोलो १, या पदांवर भरती होणार आहे. महिलांसाठी ॲथलेटिक्स मध्ये १, क्रिकेट १, हॉकी १, बास्केटबॉल १, आणि टेनिसबॉल मध्ये १.

वेतन

(Railway Jobs 2021) पश्चिम रेल्वेच्या लेव्हल ४ पदांवर नियुक्त करण्यात येणाऱ्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत २५,००० ते ८१,१०० रुपये वेतन दिले जाईल.

लेवल ५ साठी निवडलेल्या उमेदवारांचे वेतन २९,२०० ते ९२,३०० रुपयांच्या दरम्यान असेल.

उर्वरित १६ पदांसाठी, लेवल -२ साठी वेतन १९,९००-६३,२०० रुपये असेल.

लेवल-३ च्या कर्मचाऱ्यांसाठी २१,७०० – ६९,१०० रुपये पर्यंत वेतन मिळेल.

या पदासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३ सप्टेंबर २०२१ आहे. ज्या खेळाडूने १ एप्रिल २०१९ ते २८ जुलै २०२१ या दरम्यान चॅम्पियनशीपमध्ये सहभाग घेतलेला असावा.

वयोमर्यादा

या पदासाठी किमान १८ आणि जास्तीत जास्त २५ वय असलेले उमेदवार अर्ज करु शकतात.

(Railway Jobs 2021) लेवल ४ आणि ५ साठी, अर्जदार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. लेवल २ आणि ३ साठी, कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून १२ वी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

हे ही वाचलत का :

मोहरम निमित्त बाबुजमाल दर्ग्यातील खत्तलरात्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT