दीपिका पादुकोण हिने अंत्यसंस्कारावेळी घातलेल्या कपड्यांचा लिलाव केला?

दीपिका पादुकोण
दीपिका पादुकोण

मुंबई; पुढारी ऑनलाईन : दीपिका पादुकोण हिने अंत्यसंस्कारावेळी घातलेल्या कपड्यांचा लिलाव केला? वाचा सविस्तर माहिती. दीपिका पादुकोण गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या लिव लव्ह या फाऊंडेशनतर्फे स्वतःच्या डिझायनर कपड्यांचा लिलाव करते.

तिचे फॅन्स तिचे हे कपडे हौसेने मोठी किंमत मोजून खरेदी करतात.

या लिलावातून उभे राहिलेले पैसे या फाऊंडेशनकडून केल्या जाणार्‍या समाजकार्यासाठी वापरले जातात.

दीपिका पादुकोण
दीपिका पादुकोण

नुकतेच दीपिकाने तिच्या काही कपड्यांचे फोटोज् सोशल मीडियात शेअर केले होते. त्यात डिझायनर सफेद कुर्तेही होते.

पण, या पोस्टनंतर अभिनेत्री जिया खान हिच्या तसेच प्रियांका चोप्राच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी परिधान केलेल्या कपड्यांचा लिलाव दीपिका करत असल्याचा दावा सोशल मीडियात काही जणांनी केला होता.

त्यावरून दीपिका ट्रोलही झाली. पण दीपिकाचे फॅन्स सोशल मीडियात लगेच धावून आले आणि त्यांनी स्पष्ट केले की, हे कपडे दीपिकाने अंत्यसंस्कारावेळी परिधान केलेले नसून, प्रेयर मीटवेळी परिधान केले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news