pushpa : the rise  
Latest

Pushpa The Rise : अल्लू अर्जुनसह ‘या’ कलाकारांना मिळाले कोट्यवधी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन-रश्मिका मंदाना स्टारर पुष्पा (Pushpa The Rise ) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. थिएटर्समध्ये धूमाकूळ घातल्यानंतर आता दिग्दर्शक सुकुमारचा तेलुगु ॲक्शन-ड्रामा पुष्पा: द राईज पार्ट १ (Pushpa The Rise) हा ७ जानेवारीला डिजिटल प्लॅटर्फाम ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झाला. हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर 'तेलुगु, तमिऴ, मल्याऴम आणि कन्नड' भाषेत रिलीज झाला.

या चित्रपटाने चांगली कमाई केलीय. खूप सारा ड्रामा आणि ॲक्शन असलेला तेलुगू चित्रपट 'पुष्पा: द राईज'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

अशी आहे कहाणी

या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुनने पुष्पा राजची भूमिका साकारलीय. रश्मिका ॲक्शन थ्रीलरमध्ये श्रीवल्लीच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट आंध्र प्रदेशच्या रायलसीमा भागातील शेष चलम डोंगरातील लाल चंदनच्या तस्करांवर आधारित आहे.

हे आहेत कलाकार

चित्रपटामध्ये टॉलीवूड अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. जगपति बाबू, प्रकाश राज, धनंजय, अनसूया भारद्वाज, हरीश उथमन आणि वेनेला किशोर चित्रपटामध्ये सहाय्यक भूमिकेत आहेत. तुम्हाला माहितीये का, या कलाकारांना या चित्रपटात काम करण्यासाठी किती पैसे मिळाले आहेत? पैशांचा आकडा पाहून तुमचे डोळे विस्फारतील. कारण, हा आकडा कोट्यवधींच्या घरात आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने आतापर्यंत ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

अल्लू अर्जुन

'पुष्पा: द राइज' चित्रपटाचा मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन याने या चित्रपटात पुष्पा राज नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनला ५० कोटींची ऑफर देण्यात आली होती.

रश्मिका मंदाना

'पुष्पा: द राईज' या चित्रपटात रश्मिका मंदाना श्रीवल्लीच्या भूमिकेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिकाला या चित्रपटासाठी ८ ते १० कोटींची ऑफर देण्यात आली होती.

सामंथा रुथ प्रभू

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने 'पुष्पा: द राइज' या चित्रपटातील 'ओ अंतवा ऊओ ऊ' आयटम साँग केलं आहे. एका गाण्यासाठी सामंथाला १.५ कोटी ते २ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली.

फहद फासिल

अभिनेता फहद फासिलने या चित्रपटात आयपीएस अधिकारी भंवर सिंग शेखावतची भूमिका साकारलीय. फहादला या चित्रपटासाठी ३-४ कोटी रुपये मिळाले आहेत.

सुनील

'पुष्पा: द राईज' या चित्रपटात अभिनेता सुनीलने मंगलम श्रीनूची भूमिका साकारली आहे. सुनीलला या भूमिकेसाठी १ ते १.५ कोटी रुपये मिळाले आहेत.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT