शहरातील वानवडी परिसरात लेफ्टनंट कर्नल महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. रश्मी आशुतोष मिश्रा (वय ४३) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला अधिकाऱ्याने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.
रश्मी मिश्रा या जयपूर येथे आर्मी इंटेलिजन्समध्ये मूळ पोस्टिंगला होत्या. पुण्यातील आर्मी ट्रेनिंग स्कूलमध्ये सहा महिन्याचे ट्रेनिंग घेण्यासाठी त्या आल्या होत्या. तीन महिन्यांचे ट्रेनिंग पूर्ण झाले हाेते. त्यांचे पती देखील कर्नल आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली.