pune crime : सैन्यदलात सुभेदार रेकॉर्ड क्लार्क या मोठ्या पदावर कार्यरत असल्याची बतावणी करून लग्नाच्या आमिषाने एका तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, शिवाजीनगर येथील एका ३० वर्षाच्या तरुणीने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोबाईलधारक प्रशांत पाटील नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची शादी डॉट कॉम या विवाह जुळविणार्या वेबसाईटच्या माध्यमातून ओळख झाली.
आरोपीने आपण लष्करात सुभेदार रेकॉर्ड क्लार्क पदावर आहे, असे सांगून त्या पदाचा गणवेश घातलेले फोटो फिर्यादी यांना पाठवले.
फिर्यादीसोबत लग्न करतो, असे आश्वासन देऊन विश्वास संपादन केला. त्याने आपले नाव प्रशांत बाबुराव पाटील असे सांगितले होते.
फिर्यादी यांना १८ नोव्हेबर रोजी नवले पुलाजवळील एका लॉजमध्ये नेले.
तेथे फिर्यादी यांचा विरोध असताना त्यांच्यावर जबरदस्तीने शारिरीक व अनैसर्गिक अत्याचार केले.
दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या तरुणीने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
हे ही वाचलं का?