anna hazare : आण्णा हजारे रूबीमध्ये दाखल ; औषधोपचारानंतर तब्येत स्थिर असल्याची माहिती | पुढारी

anna hazare : आण्णा हजारे रूबीमध्ये दाखल ; औषधोपचारानंतर तब्येत स्थिर असल्याची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा

anna hazare : ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे (वय 84) यांना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून छातीत दुखत असल्याने गुरूवारी त्यांना उपचारासाठी रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केले. त्यांची अँजिओग्राफी तपासणी केली असता त्यांच्या ह्रदयातील रक्तवाहिनीत किरकोळ स्वरूपात अडथळा (ब्लॉकेज) असल्याचे आढळून आले आहे.

त्यासाठी त्यांना औषधोपचार देण्यात आला आहे व त्यांची तब्येत स्थिर आहे. येत्या दोन ते तीन दिवसानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल, अशी माहिती रुग्णालयाचे मुख्य व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेज ग्रँट यांनी दिली.

anna hazare : ‘इसीजी’ तपासणी करण्यात आली

रुबी हॉल क्लिनिकने जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार आण्णा हजारे यांना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून छातीत दुखत होते.

त्यांना गुरूवारी रूबी हॉल क्लिनिकमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तेथे त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासले. यानंतर त्यांची ‘इसीजी’ तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये ह्रदयाच्या कार्यपध्दतीमध्ये काही बदल आढळून आले.

ह्रदयामधील रक्तवाहिनीत थोडे ब्लॉकेज

यानंतर त्यांच्यावर मुख्य ह्रदविकारतज्ज्ञ डॉ. परवेज ग्रँट आणि डॉ. सी.एन. मखळे यांनी त्यांच्या ह्रदयाची अँजिओग्राफी चाचणी केली.

असता त्यामध्ये त्यांच्या ह्रदयामधील रक्तवाहिनीत थोडे ब्लॉकेज दिसून आले. डॉ. परवेज ग्रँट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सूरू आहेत.

आण्णा हजारे यांच्या ह्रदयातील किरकोळ अडथळा आढळून आला असून त्यासाठी अँजिओप्लास्टी करण्याची आवशकता नाही. ह्रदयामध्ये असे किरकोळ ब्लॉकेज असतात व त्याला अँजिओप्लास्टी करण्याची गरज पडत नाही. यावर त्यांना काही औषधोपचार देण्यात आला आहे. सध्या त्यांची तब्येत स्थिर असून त्यांना येत्या दोन ते तीन दिवसांत घरी सोडण्यात येणार आहे.
– डॉ. परवेज ग्रँट, मुख्य विश्वस्त, रूबी हॉल क्लिनिक

Back to top button