Latest

Pune Crime : 2 लाखाच्या बदल्यात हाती आल्या साबणाच्या वड्या

रणजित गायकवाड

पुणे; पुढारी वृत्तसेवा : Pune Crime : पुर्वी तो यूएईत नोकरी करत होता. कोरोनाच्या कालावधीत हातचे काम गेले. त्यामुळे तो भारतात परत आला होता. येथे आल्यानंतर तो शहरातील कॅफेनां खाद्यापदार्थ पुरविण्याचे काम करत होता. त्याला परत दुबईला जायचे होते. अशातच एका मित्राने एक व्यक्ती यूएईच्या दिरहम चलनाचा पुरवाठा करीत असल्याचे सांगितले. त्याने दोन लाखाचे दिरहम घ्यायचे ठरवले. पैशाची जुळवाजुळव केली.

दिरहम देणारा व्यक्ती आला ठरल्याप्रमाणे त्याने पिशवी दाखवली. मात्र हातचलाखी करत तरुणाला धक्का देऊन त्याच्या हातातील दोन लाखाची रोकड असलेली बॅग घेऊन पळ काढला. दिरहम तर मिळालेच नाहीत. मात्र त्या बदल्यात साबणाच्या वड्या घेऊन दोन लाखावर पाणी सोडण्याची वेळ तरुणावर आली आहे.

याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेखर मुळीक (28, रा.आंबेगाव पठार) या तरुणाने फिर्याद दिली आहे. ही घटना जगताप डेअरी समोरुन थोडे पुढे गेल्यावर अप्पर कोंढवा रोडवरील साईनगर गल्ली येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाचे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण झालेले आहे. पुर्वी तो यूएईत नोकरी करत होता. मात्र कोरोनाच्या कालावधीत त्याचे काम गेले. तो भारतात परतला होता. येथे सद्या तो कॅफेमध्ये लागणार्‍या खाद्यपदार्थाचा पुरवठा करण्याचा व्यवसाय करत होता.

त्याच्या ओळखीतील मित्र संजय मांगडे याच्या गाडीचालकाला रस्त्यात भेटलेल्या एका अनोळखी व्यक्तीने युनायटेड अरब इमीरेटस या देशाचे दिरहम नोट दिली होती. त्या व्यक्तीने चालकास ही नोट कोठे चालत असले तर सांग असा निरोप दिला होता.

मांगडे यांना त्यांच्या चालकाने ही माहिती दिल्यानंतर चौकशी केली असता एका दिरहमचे भारतीय चलनात 900 रुपये होतात असे कळले.

ही बाब मुळीक यांना मांगडे यांनी सांगितली. यानंतर मुळीक व त्यांचा मित्र मांगडे यांनी मोठी रक्कम देऊन दिरहम घेण्याचे ठरवले. त्यानूसार त्यांनी मोबाईलवरुन आरोपीशी संपर्क साधला. आरोपी व त्याच्या साथीदाराची प्रत्यक्ष भेट झाली.

यानंतर आरोपींनी दिरहम या नोटा देण्याचा बहाना करुन व्हिल कंपनीचे कपडे धुण्याचे साबनाला इंग्रजी व मराठी वर्तमानपत्र गुंडाळुन, रुमालाने बांधालेला गट्टा व त्याखाली निळ्या रंगाचे जिन्सचे पँटचे तुकडा असलेला लाल रंगाची नायलॉनचे पिशवी, फिर्यादी यांचे हातामध्ये दिली.

फिर्यादी मुळीक हे पैसे घेऊन गाडीतून बाहेर येत असतानाच आरोपींनी त्यांना धक्का मारून जबरदस्तीने पैसे असेलेली बॅग हिसकावली. आरोपीने दिलेल्या धक्क्यात फिर्यादी खाली पडले होते.

त्यांचा मित्र मागडे गाडीत बसून होता. त्यांना हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी मुळीक यांना उठवून आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतू अंधाराचा फायदा घेत दोघा आरोपींनी पळ काढला होता. पिशवीत 500 व 2000 हजाराच्या नोटा असलेली दोन लाख एक हजाराची रोकड होती.

दरम्यान यापुर्वी देखील असे प्रकार शहरात घडलेले आहेत. कमी पैशात विदेशी चलन देण्याच्या बहाण्याने हात चलाखी करून नागरिकांना लोखोंचा गंडा तोतयांनी घातलेला आहे.

नागरिकांना जाळ्यात खेचण्यासाठी नातेवाईक विदेशातून आले आहेत. त्यांच्याकडे मोठ्याप्रमाणात विदेशी चलन असून, त्यांना ते कमी पैशात द्यायचे आहे. असे सांगून फसवणूक केली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा बाहेर वावर कमी होता.

त्यामुळे मागील दिड वर्षात असे प्रकार घडल्याचे निदर्शनास नाहीत. मात्र जनजीवन पुर्वपदावर येत असतानाच तोतयांनी अशाप्रकारे नागरिकांना गंडा घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

तक्रारदाराचे हॉटेलमॅनेजमेंटचे शिक्षण झालेले आहे. पुर्वी ते यूएई येथे नोकरीला होते. कोरोनामुळे ते भारतात परत आले होते. कॅफेमध्ये लागणार्‍या खाद्यपदार्थाचा पुरवठा करण्याचा व्यवसाय करत होते. नोकरीसाठी परत त्यांना यूएईत जायचे होते. त्यामुळे त्यांना दिरहम हवे होते. मात्र चोरट्यांनी त्यांच्या हाती साबनाच्या वड्या हवाली करून धक्का मारून त्यांच्याकडील रोकड असलेली पिशवी हिसकावली.

आर.सी. उसगांवकर, सहायक पोलिस निरीक्षक

अभिनेत्री अदिती सारंगधरने बनवला फक्कड चहा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT