पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्वप्नातील घरे, निसर्गरम्य ठिकाणची फार्म हाऊससाठीची जमीन, अत्याधुनिक युगाची साक्ष देणारी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची माहिती एकाच छताखाली मिळण्याची सोय आपल्या लाडक्या 'पुढारी' वृत्तपत्राने उपलब्ध करून दिली आहे. राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे दिमाखदार सोहळ्यात 'पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो' आणि 'ऑटो शो-2023'चे शनिवारी उद्घाटन झाले. दोन दिवस चालणार्या या सोहळ्याचे पुणेकरांनी जोरदार स्वागत केले.
'पुढारी' माध्यमसमूहाचे चेअरमन योगेशदादा जाधव, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे, मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घाटे, बँक ऑफ महाराष्ट्रचे उप सरव्यवस्थापक प्रशांत दास, मुख्य व्यवस्थापक श्रीमती मालिनी, सेहगल ऑटोराइडर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत वझे, मांढरे असोसिएट्सचे मनोज मांढरे, सूर्यकांत काकडे अॅण्ड असोसिएट्सचे जय काकडे या वेळी उपस्थित होते. या एक्स्पोत नामांकित वाहन कंपन्या आणि बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले आहेत. अनेकांना घर घ्यायचे असते. मात्र, विविध पर्याय त्यांना एकाच छताखाली उपलब्ध होत नाहीत.
दुचाकी आणि चारचाकी कोणती घ्यावी, यासाठी अनेक शोरूमच्या चकरा माराव्या लागतात. नागरिकांची होणारी ही गैरसोय लक्षात घेत 'पुढारी'ने या सर्वांना एकाच छताखाली आणले आहे. नागरिकांना विकेंड होमसाठी निसर्गरम्य ठिकाणी जागा हवीय, धरणाकाठी फार्म हाऊस आणि शेतीसाठी योग्य दरात जमीन हवीय; मात्र योग्य व्यक्तीकडे पोहचायचे कसे? हे माहीत नसते. व्यवसायासाठी मोक्याच्या ठिकाणी दुकान हवे आहे. लक्झरी सदनिकांचे पर्याय शोधण्यास अडचण येत आहे. परवडणारी घरे मोक्याच्या ठिकाणी कुठे मिळतील? हे माहीत नाही, अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक 'पुढारी'ने एकाच एक्स्पोच्या माध्यमातून दिली आहे. या आगळ्या एक्स्पोला पहिल्याच दिवशी नारिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
आज (रविवार) या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. आपल्या स्वप्नातील घर आणि मनातील वाहन खरेदीसाठी पुणेकरांनी नक्की यावे.
या एक्स्पोचा आनंद रविवारी सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत घेता येईल.
मारुती हा देशाचा ब—ँड आहे. एसयूव्हीपासून विविध प्रकारच्या वाहनांच्या श्रेणी उपलब्ध आहेत. एकूण वाहन विक्रीत 60 टक्के सीएनजी कार आहेत. त्याखालोखाल हायब—ीड आणि पेट्रोल वाहनांचा क्रमांक लागतो. एसयूव्ही वाहनांची तरुणाींमध्ये क्रेझ दिसून येत आहे. मारुतीच्या वाहनांची 8 लाखांपासून ते 30 लाख रुपयांपर्यंत श्रेणी आहे. त्यामुळे अनेकविध पर्यायांतून वाहन निवडण्याची संधी खरेदीदारांना असल्याचे सेहगल ऑटोराइडर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत वझे यांनी सांगितले. प्रोव्हेंशिअल निस्सानचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र बेंदरकर म्हणाले की, एसयूव्ही श्रेणीतील मॉडेल म्हणजे खरेदीदारांच्या पैशांचे मूल्य जाणणारे आहे. जपानी तंत्रज्ञानाने ही गाडी सजलेली आहे. या श्रेणीतील वाहनांना देखभाल खर्च जवळपास नाही, असे ग्राहक आम्हाला स्वतःहून सांगतात. त्यामुळे सध्या या श्रेणीतील तीन ते साडेतीन हजार कारची दरमहा विक्री होत आहे. इलेक्ट्रिक आणि हायब—ीड श्रेणीतील आणखी पाच ते सहा मॉडेल लवकरच दाखल होत आहेत.
आयुष मोटरचे कुणाल डेंगे म्हणाले की, यामाहा हा ब—ँड तरुणाईच्या मनावर राज्य करीत आहे. एफझेड श्रेणीतील बाइक आणि फसिनो ही मोपेड तरुणांच्या पसंतीस उतरलेली आहे. दिसण्यास आकर्षक आणि कामगिरीस उत्तम असलेल्या या दुचाकी आहेत. पूर्वी केवळ स्पोर्ट बाइक म्हणून लोकप्रिय झालेल्या यामाहा एफझेडमुळे टुरिंग बाइक झाली असल्याचे आयुष मोटरचे मालक कुणाल डेंगे यांनी सांगितले. वाहनप्रेमींना मोहवणारी व्हेस्पा आता आय-गेट या नव्या इंजिनासह येत आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा इंजिनाची ताकद वाढणार आहे. तसेच, प्रतिकिलोमीटर अॅव्हरेज 45 किलोमीटरवर जाईल, अशी माहिती चिखले मोटर्सचे अमर चिखले यांनी दिली. तूनवाल ई-मोटर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. झूमरमल तूनवाल म्हणाले की, आम्ही पाच लाखांहून दुचाकी विकल्या आहेत. सामाजिक दृष्टिकोन बाळगत दिव्यांग व्यक्तींसाठी खास दुचाकी विकसित केली आहे. सिंगल चार्जमध्ये साठ ते शंभर किलोमीटर अंतर कापण्याची क्षमता दुचाकीमध्ये आहे. सिटी बाईक म्हणून ही वाहने अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहेत.
मित्तल ब्रदर्स म्हणजे लक्झरी अनुभव देणारे नाव हिंजवडी, बाणेर आणि फर्ग्युसन रस्ता, अशा ठिकाणी गृह आणि व्यावसायिक संकुले उभी राहत आहेत. हिंजवडीत तब्बल 12 एकर जागेत रहिवासी इमारत उभी राहत आहे. यातील साडेपाच एकर जागा बॅडमिंटनपासून ते स्केटिंगपर्यंतच्या क्रीडांगणासाठी राखून ठेवली आहे. याशिवाय जलतरण तलाव, ओपन जिम, गेस्ट हाऊस अशीही सुविधा देण्यात आली आहे. बाणेर आणि फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर पूर्ण व्यावसायिक इमारत उभी राहत आहे. या इमारती शहराच्या सौंदर्यात भर घालणार्या ठरणार आहेत, अशी मागिती वरिष्ठ विक्री व्यवस्थापक अद्वैत अनासपुरे यांनी दिली. नवले बि—ज ते कात्रज चौकातील रस्त्यावर राजमाता जिजाऊ भुयारी मार्गाशेजारी तीन एकर जागेत रहिवासी आणि व्यावसायिक टॉवर उभे राहत आहे. भुयारी अधिक दोन मजली प्रशस्त पार्किंग देण्यात आले आहे. रहिवासी संकुलात एक आणि दोन बीएसके सदनिका आहेत. महामार्गानजीक प्रथितयश शैक्षणिक संस्थांचा शेजार लाभलेल्या या परिसरात खरेदीची दुहेरी संधी उपलब्ध झाली असल्याची माहिती साई संकल्प प्रकल्पाचे संचालक दीपक माने, अनंता मोरे आणि युवराज बेलदरे यांनी दिली.
निसर्गाच्या सान्निध्यात आपले फार्म हाऊस असावे, असे अनेकांचे स्वप्न असते. त्यांच्यासाठी गारवाने पुणे शहरापासून अगदी जवळ असलेल्या सह्याद्रीच्या खोर्यातील जमीन उपलब्ध करून दिली आहे. केतकावळे येथे 207 एकर, पारगाव खंडाळा येथे 23 एकर जमीन उपलब्ध आहे. तर, भोर तालुक्यातील मळे येथे अडीचशे एकर कृषी जमीन माफक दरात उपलब्ध असल्याची माहिती गारवाच्या विनोद धुमाळ यांनी दिली. सृष्टी फार्मचे संचालक मंगेश खरपुडे म्हणाले की, भाटघर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात वनराई वॉटर, वृंदावन फार्म आणि वृंदावन धाम या नावाने शेतजमीन उपलब्ध करून दिली जात आहे. येथे एक एकर जमिनीत सहाशे चौरस फुटांचे जांभा दगडातील घर बांधून दिले जाईल. सोबतच झाडेही जोपासून दिली जातील. विशेष म्हणजे, झाडांच्या जोपासणीचा कोणताही खर्च खरेदीदारांकडून घेतला जात नाही.
सामान्य नागरिकांना परवडेल अशा किमतीतील घरे सिंहगड रस्ता, धायरी, किरकटवाडी, कर्वेनगर, वडगाव येथे उपलब्ध आहेत. अगदी वन रूम किचन, एक बेडरूम किचनच्या सदनिका माफक दरात उपलब्ध आहेत. सामान्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आम्ही काम करीत असल्याचे धुमाळ डेव्हलपर्स ग्रुपचे तुषार धुमाळ यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधलेल्या तोरणागडावरून आमच्या प्रकल्पाला नाव दिले जाते. आपल्या मातीशी जोडणारे प्रकल्प उभारण्याकडे आमचा कल असतो. आजवर एक हजाराहून अधिक कुटुंबांसाठी आम्ही घरांची निर्मिती केली आहे. भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव पठारावर नवा प्रकल्प साकारत आहे. टू-बीएचके सदनिका येथे उपलब्ध असल्याची माहिती मांढरे असोसिएट्सच्या मनोज मांढरे आणि अक्षय मांढरे यांनी दिली.
हेही वाचा