कोल्‍हापूर : राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडला | पुढारी

कोल्‍हापूर : राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडला

राधानगरी; पुढारी वृत्तसेवा प्रदीर्घ विश्रांतीनंतर राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेले दोन मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज (रविवार) सकाळी 4.44 वाजण्याच्या सुमारास धरणाचा सहा नंबरचा स्वयंचलित दरवाजा खुला झाला. या दरवाजातून 1428 व वीज गृहातुन 1400 असा एकूण 2828 कयुसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे.

आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात धरण क्षेत्रात 51 मिमी पावसाची नोंद झाली असून, जून पासून आज अखेर 3474 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात 8319.57 द.ल.घ.फु.इतका पाणीसाठा आहे. 347.28 फूट इतकी पाणीपातळी आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पिकांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या स्थितीमुळे भाताचे पीक धोक्यात आले होते. पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.

हेही वाचा : 

Back to top button