priya banerjee-prateik 
Latest

Prateik Babbar : पत्नीशी वेगळे झाल्यानंतर प्रतीक करतोय ‘या’ सुंदर अभिनेत्रीला डेट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेते राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा आणि अभिनेता प्रतीक बब्बरच्या जीवनात नवी तरुणी आलीय. रिपोर्ट्सनुसार, प्रतीक (Prateik Babbar) सध्या अभिनेत्री प्रिया बॅनर्जीला डेट करत आहे. प्रतीक बब्बर यांनी २३ जानेवारी, २०१९ रोजी सान्या सागरशी लग्न केले होते. लग्न करण्याआधी सान्या आणि प्रतीकने काही वर्षे डेट केलं. पण, लग्नाच्या एक वर्षांनंतर त्याच्या वैवाहिक जीवनात अडचणी आल्या. लॉकडाऊनमध्ये तर प्रतीक आणि सान्या यांच्यातील नातेसंध आणखी बिघडत गेले. आता नव्या रिपोर्ट्सनुसार, प्रतीक बब्बरच्या आयुष्यात नवं प्रेम आलं आहे. तो प्रिया बॅनर्जी नावाच्या अभिनेत्रीला डेट करत असल्याची माहिती समोर आलीय. (Prateik Babbar)

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रतीक सध्या खुश आहे. तो 'बार-बार देखो' फेम अभिनेत्री प्रिया बॅनर्जीला डेट करत आहेत.

प्रतीक-प्रियाचं प्रेम

प्रतीक बब्बरच्या एका जवळच्या सूत्रांनी सांगितलं की, 'ते एकमेकांना एक वर्षांपासून ओळखतात. ते टीव्ही जगतातील एक कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून एकमेकांना भेटले होते. त्याचबरोबर, प्रतीक बब्बरने प्रिया बॅनर्जीविषयी आपल्या कुटुंबीयांना सांगितलं आहे. प्रतीक-प्रिया नेहमी बाहेर फिरतात आणि एकत्र कामदेखील करतात. पण, त्यांनी अद्याप आपले नाते सार्वजनिक केलेले नाही.

प्रतीक बब्बरचा पुढील चित्रपट

प्रतीकने याविषयी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. प्रिया बॅनर्जीविषयी सांगायचे झाले तर तिने संजय गुप्ता यांच्या 'जज्बा' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये करिअरची सुरुवात केली होती. तर प्रतीक बब्बर 'वो लडकी है कहां' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तापसी पन्नू आणि प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT