Latest

दूधीच्या ज्यूसमुळे विषबाधा ; ‘या’ अभिनेत्याची पत्नी गेली आयसीयूत

सोनाली जाधव

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपला ने चुकीच्या पद्धतीने दूधीच्या ज्यूसमुळे विषबाधा झाली. यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

https://www.instagram.com/reel/CUyv0znI2RE/?utm_source=ig_web_copy_link

प्रकृती ठणठणीत रहावी यासाठी अनेक जण 'दूधी' चा रस सेवन करतात. पण दूधी जितका गुणकारी तितकाच तो नुकसानदायकही आहे. नुकतचं  ताहिराने इंन्स्टाग्रामवर एक व्हिडोओ शेअर केला आहे. या व्हिडोओ मध्ये तिने दूधीचा ज्यूस घेत असताना घ्यावयाची काळजी संबधित बोलली आहे.

दूधीच्या ज्यूसमुळे विषबाधा

ताहिरा कश्यपने दूधीचा ज्यूस घेतल्याने तिला विषबाधा झाली. त्यामुळे तिला चक्क रुग्णालयात दाखल केले.  तिला  आयसीयूती दाखल करावे लागले.  त्यानंतर ताहिराने एक व्हिडोओ  करून चाहत्यांना आवाहन केले आहे, ती म्हणतेय  दूधी चा ज्यूस  जितका गुणकारी  आहे तितकाच तो नुकसानदायकही आहे.' कडवट दुधीचा ज्युस विषबाधा करू शकताो. मी दुधीचा ज्युस घेत असताना दूधीचा रस, हळद आणि आवळ्याच्या रस घेते  पण यावेळी दूधीचा रस घेतला तेव्हा मला उलट्या होवू लागल्या.  रक्तदाब वाढला. दुधीचा ज्यूस कडवट असल्याने तसे झाले असावे. हे अचानक झाले.  माझ्यासाठी हा अनुभव वाईट होता. वेळीच योग्य उपचार केल्याने माझी तब्येत ठीक झाली.'

या अगोदरही काही अभिनेत्यांना दूधीची बाधा झाली होती. २०१५ मध्ये होम मिनीस्टर फेम 'भावोजी' आदेश बांदेकर यांना कडू दुधीचा रस प्याल्यामुळे बाधा झाली होती.  त्यांची प्रकृती बिघडल्याचे निदान डॉक्टरांनी केल्यावर त्वरित योग्य उपचार केल्याने ती बचावले होते. बांदेकर यांनाही आयसीयूत दाखल करावे लागले हाोते.

दुधीचे फायदे 

दुधी भोपळ्यामध्ये ब, क आणि के हे जीवनसत्व असतात. त्याचबरोबर पोटॅशियम, मँगनीज ही खनिजे असतात. चांगल्या दुधीचा रस प्यायल्याने मधुमेह, ह्रदयविकार, यकृताचे आजार कमी होण्यास मदत होते व प्रकृती ठणठणीत राहण्यास मदत होते. दुधी कडू असेल तर त्यामध्ये विषारी द्रव्य असल्याने भाजी करू नये किंवा रसही घेउ नये.

पाहा हा व्हिडोओ:

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच दर्शन | 'कौमारी मातृका' रुपात पूजा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT