Latest

कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी खुशखबर, पीएम किसान योजनेच्या e-KYC अपडेटसाठी पुन्हा मुदतवाढ

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. PM किसान योजनेची e-KYC अपडेट करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या 12.53 कोटी शेतकऱ्यांसाठी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनिवार्य असणारी eKYC आता 22 मे पर्यंत पूर्ण करता येईल.

यापूर्वी त्याची अंतिम तारीख ३१ मार्च होती. PM किसानचा पुढचा किंवा 11 वा हप्ता 1 एप्रिल 2022 नंतर कधीही तुमच्या खात्यात येऊ शकतो, परंतु जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर येणारा 2000 रुपयांचा हप्ता थांबू शकतो.

पीएम किसान या पोर्टलवर (pmkisan.gov.in) एक संदेश प्रसारित केला जात आहे. त्यात म्हटले आहे की पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. यासाठी आधारच्या OTP प्रमाणीकरणाकरिता किसान कॉर्नरमधील eKYC पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधावा लागतो.

दरम्यान UIDAI कडून प्राप्त झालेल्या अधिसूचनेनुसार, UIDAI च्या OTP सेवा जारी केल्यामुळे, OTP सत्यापित करत असताना पुढील प्रतिसाद मिळण्याकरिता विलंब होत आहे. यामुळे ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 मार्च 2022 ही अंतिम तारीख बदलण्यात आली आहे. पोर्टलवरील नवीन अंतिम मुदत वाढवून आता 22 मे 2022 अशी केली आहे.

ई-केवायसी कशी पूर्ण कराल?

  • प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल फोन ब्राउझरच्या क्रोम आयकॉनवर टॅप करा आणि तेथे pmkisan.gov.in टाइप करा. आता तुम्हाला पीएम किसान पोर्टलचे मुखपृष्ठ दिसेल, त्याच्या तळाशी गेल्यानंतर ई-केवायसी पर्याय दिसेल. यावर टॅप करा. त्यानंतर त्यात तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणवर टॅप करा.
  • आता त्यात आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर 4 अंकी OTP येईल. हा OTP तेथे दिलेल्या बॉक्समध्ये टाइप करा.
  •  यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला आधार प्रमाणीकरणासाठी असणाऱ्या बटणावर टॅप करण्यास सांगितले जाईल. त्यावर टॅप करा आणि आता तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आणखी 6 अंकी OTP येईल. तो भरा आणि सबमिट वर टॅप करा.

जर ह्या सर्व प्रक्रिया पूर्ण असतील तर eKYC यशस्वीरित्या पूर्ण होईल, अन्यथा Invalid असा संदेश येईल. असे झाल्यास तुमचा हप्ता येण्यास उशीर होऊ शकतो. जर तुमचे eKYC आधीच पूर्ण झाले असेल तर eKYC आधीच पूर्ण झाले आहे असा संदेश दिसेल. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशात आणखी १२ कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.

11वा हप्ता कधी येणार

या योजनेंतर्गत, प्रत्येक आर्थिक वर्षात, मोदी सरकार शेतकऱ्यांना रूपये 2000 प्रमाणे तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये देते. याअंतर्गत दरवर्षी पहिला हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलै, दुसरा हप्ता १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता १ डिसेंबर ते ३१ मार्च या कालावधीत येतो.

हिंदू नववर्षाच्या दिवशी किंवा रामनवमीच्या दिवशी 10 एप्रिलला पंतप्रधान मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 11व्या हप्त्याची रक्कम पाठवण्याची शक्यता आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना मोदी सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू केली होती.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT