राज्‍यात कितीही बिकट परिस्थिती आली तरी वीजपुरवठा खंडित होणार नाही : नितीन राऊत | पुढारी

राज्‍यात कितीही बिकट परिस्थिती आली तरी वीजपुरवठा खंडित होणार नाही : नितीन राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात कितीही बिकट परिस्थिती आली तरी वीजपुरवठा खंडित होणार नाही. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सरकारचे खासगीकरणाचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन करणार नाही, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत  यांनी आज (मंगळवार) दिली.

केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात देशभरातील वीज कर्मचाऱ्यांनी २८ आणि २९ मार्च दोन दिवसाचा संप पुकारला आहे. या संपात ३९ कर्मचारी संघटनांनी भाग घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर बाोलाना मंत्री राऊत म्‍हणाले की, राज्यात वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू राहिल्यास आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे.विजेच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच कोळसा टंचाईमुळे संकट निर्माण झाले आहे; परंतु, सध्य़ा तरी राज्यात वीज प्रकल्प सुरू ठेवण्यात यश मिळवले आहे. विजेच्या मागणीत सध्या २८ मेगावॅटपर्यंत वाढ झाली आहे. वीज कामगारांच्या संपावर कर्मचारी संघटनेशी चर्चा केली आहे. कोळसा टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही राऊत यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button