School Astronomy Lab Pudhari
पिंपरी चिंचवड

Thergaon PM Shri School Astronomy Lab: थेरगावच्या पीएम श्री विद्यालयात ‘ॲस्ट्रॉनॉमी लॅब’; विद्यार्थ्यांना मिळणार अवकाशाचा प्रत्यक्ष अनुभव!

दुर्बिणी, ग्रहांचे मॉडेल, डिजिटल सिम्युलेटरसह विविध उपकरणे उपलब्ध; १,२४९ विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचा अभ्यास करण्याची संधी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: थेरगाव येथील पीएम श्री माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026 - 27 पासून विद्यालयात ॲस्ट्रॉनॉमी लॅब कार्यान्वित झाली आहे. ही लॅब म्हणजे विद्यार्थ्यांना आणि विज्ञानाच्या अभ्यासक विद्यार्थ्यांना आकाश, ग्रह, तारे आणि अवकाशातील घटकांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी बनवलेली एक विशेष जागा आहे. येथे पुस्तकी ज्ञानाऐवजी दुर्बिणी आणि उपकरणांच्या साहाय्याने खगोलशास्त्रीय प्रयोगांचे शिक्षण दिले जाते.

..अशी आहे लॅब

दुर्बिणीच्या सहायाने तारे, ग्रह आणि अवकाशाचे निरीक्षण करता येते. याशिवाय ऑप्टिकल किट्स, अवतल लेन्स, मिरर किट्स आणि रे ऑप्टिक्स बॉक्स.

अवलंबन साधने

मून फेज किट्स, पिनहोल प्रोजेक्टर आणि तारकासमूह दर्शवणारे नकाशे व मॉडेल्स.

सॉफ्टवेअर

आकाश दर्शनासाठी किंवा स्काय सफारीसारखे डिजिटल ॲप्स आणि सिम्युलेटर ही साधने लॅबमध्येे उपलब्ध आहेत .

ग्रहावरील वजन मोजण्याचे यंत्र

अंतराळ संशोधन केंद्रे, त्यांनी पाठवलेले यान याचीही माहिती मिळते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ व खगोल अभ्यासक यांची नावे व या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाची माहिती मिळते. भूगोल विषयातील अनेक संकल्पना या लॅबच्या मदतीने सहजपणे समजून जातात. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, विविध ग्रहांची माहिती मिळून जाते.

सूर्यमालेतील सर्व ग्रहांची माहिती मिळते. विद्यार्थ्यांसाठी लॅब मधे कुतूहलाची बाब म्हणजे वजन यंत्र कोणत्या ग्रहावर स्वतःचे वजन समजते त्यामुळे ग्रहांचा तुलनात्मक अभ्यास करणे शक्य होते. थोडक्यात अवकाशातील घटनांचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल.

या विद्यालयात सध्या 1249 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या लॅबमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण होऊन विज्ञान व अंतराळातील विविध बाबींची ओळख निर्माण होईल. तसेच भविष्यात चांगले वैज्ञानिक व खगोलशास्त्रज्ज्ञ तयार होण्यास ही लॅब महत्त्वाची भूमिका बजावेल.
बाबासाहेब राठोड (मुख्याध्यापक, पीएम श्री माध्यमिक विद्यालय थेरगाव)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT