Talegaon Power Supply Pudhari
पिंपरी चिंचवड

Talegaon Power Supply: तळेगावात पावसाळ्यापूर्वी वीज यंत्रणेची दुरुस्ती; खंडित पुरवठा टाळण्यासाठी तयारी

झाडांच्या फांद्या छाटणे, वीजवाहिन्यांची दुरुस्ती सुरू; मान्सूनपूर्व कामांना वेग

पुढारी वृत्तसेवा

तळेगाव स्टेशन: काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. दरवर्षी पावसाळ्यात नागरिक खंडित वीजपुरवठा, झाडांच्या फांद्या पडणे आदी समस्यांनी त्रस्त असतात. त्यामुळे महावितरण आणि तळेगाव दाभाडे नगर परिषदेने पावसाळ्यापूर्वी कामांना सुरुवात केल्याचे दिसत आहे.

अवकाळीमुळे वीजपुरवठा होतोय खंडित

तळेगाव स्टेशन परिसरात मागील आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. पाऊस आला की वीजपुरवठा खंडित होत होता. लाईनवर झाड पडणे, तारा तुटणे, झाडाच्या फांद्या लाईनला लागणे, इन्सुलेटर पंक्चर होणे आदी कारणांनी वीजपुरवठा खंडित होतो. नागरिकांना अंधारात, उकाड्यात रहावे लागून गैरसोयींना तोंड द्यावे लागते.

तसेच, व्यावसायिकांचेही नुकसानही होते. वीज गेल्यानंतर वीज कर्मचारी तातडीने अहोरात्र कामे करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात. पाऊस आला की परत वीज जाते हे सतत ठरलेले असते. यामुळे वीजग््रााहकांना आणि वीज कर्मचाऱ्यांनादेखील त्रासदायक होते. महावितरण आणि महापारेषण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा खंडित होण्याची वाट न पाहता मान्सूनपूर्व देखभालीची कामे करावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती.

लाईनवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे, क्षमता कमी झालेल्या वीज वाहिन्या बदलणे, वाकडे झालेले पोल सरळ करणे आदी कामे करण्याचे कामे सुरू आहेत. तसेच, महापारेषणला अतिउच्च दाब वाहिनीचा वीजपुरवठा चिंचवडवरुन होतो. या मार्गात पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी योग्य ती कार्यवाही केली जात आहे.

सध्या वीजपुरवठ्यावर भरपूर लोड वाढला असून, अनेक ठिकाणी वीजवाहक तारा पूर्वीच्याच आहेत. यामुळेही तारा वितळून वीजपुरवठा खंडित होतो. तरी अशा तारा बदलण्यात याव्यात.
लहू ढेरेंगे, अध्यक्ष, स्वप्ननगरी सार्वजनिक मित्र मंडळ
तळेगाव दाभाडे कार्यक्षेत्रातील झाडांच्या फांद्या छाटणे, वाकडे झालेले पोल सरळ करणे आदी वीज यंत्रणा देखभाल दुरुस्तीची मान्सूनपूर्व कामास एप्रिलपासूनच सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होणार नाही.
जयप्रकाश सागरे, उपकार्यकारी अभियंता, वीज महावितरण, तळेगाव दाभाडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT